सेतू अभ्यास 2023 स्वरूप अंमलबजावणी कालावधी

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे.

या करिता मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे.

त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे.

अन्य शाळा व्यवस्थापनासाठी सेतू अभ्यास परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/संस्था करू शकतात.

सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी

पूर्व चाचणी दि. ३० जून ते ३ जुलै २०२३

सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी

२० दिवसांचा सेतू अभ्यास दि. ४ जुलै ते २६ जुलै, २०२३.

सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी

उत्तर चाचणी दि.२७ ते ३१ जुलै २०२३.

सेतू अभ्यास 2023 स्वरूप अंमलबजावणी कालावधी