Recruitment For Various Posts In IDBI Bank And Sindhudurg Public Health Department
आयडीबीआय ( IDBI) बँकेत विविध पदांच्या 114 जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील या भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याबरोबरच सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथेही विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही पदे थेट मुलाखतीतून भरली जाणार आहेत. उच्छूक उमेदवारांनी येत्या 22 फेब्रुवारी रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
Table of Contents
आयडीबीआय बँक (आयडीबीआय )
पोस्ट : मॅनेजर (ग्रेड B)
शैक्षणिक पात्रता – BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E. किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि M.Sc., चार वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 75
वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 3 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in
पोस्ट : असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C)
शैक्षणिक पात्रता: BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि M.Sc., सात वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 29
वयोमर्यादा : 28 ते 40 वर्ष
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 3 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in
पोस्ट : डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D)
शैक्षणिक पात्रता : BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि M.Sc., दहा वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 10
वयोमर्यादा : 35 ते 45 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 3 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in
सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग ( Sindhudurg Public Health Department )
पोस्ट : वैद्यकीय अधिकारी – गट अ
शैक्षणिक पात्रता : MBBS किंवा ऑलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी
एकूण जागा : 56
मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीचं ठिकाण : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग-४१६८१२
मुलाखतीची तारीख : 22 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.arogya.maharashtra.gov.in