तलाठी भरती 2023|talathi bharti 2023; how to apply? and how to preparation?

Spread the love

talathi bharti 2023; how to apply? and how to preparation?}तलाठी भरती 2023; अर्ज कसा करायचा? आणि तयारी कशी करावी?

महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023: तलाठी भारती 2023 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. हे तुम्हाला तलाठी भारती परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यास मदत करेल. महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम तुमच्या तयारीला दिशा देतो. . या लेखात, तुम्हाला महाराष्ट्र तलाठी परीक्षा पॅटर्न 2023, आणि महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 बद्दल तपशीलवार विषय सूचीसह तपशीलवार माहिती मिळेल.

अर्ज कसा करायचा?

  1. फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  2. अर्ज उमेदवारास फक्त एकाच जिल्हयासाठीस अर्ज सादर करता येईल. वेगवेगळया जिल्हयात वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत. एकापेक्षा जास्त जिल्हयामध्ये अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. तथापि, एखादया उमेदवाराने एकाच जिल्हयात एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केला असल्यास त्यापैकी अंतिम अर्ज सादर केला असेल तोच अर्ज ग्राहय धरण्यात येईल.
  3. अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ :- https://mahabhumi.gov.in
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पाच सहा) अर्ज अर्ज सादर केल्यानंतर भरण्याची विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. व परिक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारिख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परिक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

१) उमेदवाराला दिलेल्या संकेतस्थळावर लॉग-इन करावे लागेल. उमेदवाराने आपल्या उजव्या बाजूला असलेल्या ‘सूचना या पर्यायावर क्लिक करावे. तिथून उमेदवाराला थेट नोंदणीच्या  पोर्टलवर नेले जाईल. पहिल्यांदाच नोंदणी केली जात असल्यास उमेदवाराने नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करून यूजर नेम, पासवर्ड आणि इमेल आयडी टाकावा. उमेदवाराला त्यानंतर त्याच्या/तिच्या प्रमाणित इमेल आयडीवर सक्रीयतेची लिंक मिळेल जी त्यांच्या साइनअपशी संबंधित असेल. उमेदवाराने त्याचे/तिचे खाते सक्रीय करण्यासाठी त्याच्या/तिच्या इमेल आयडीवर मिळालेल्या सक्रीयतेच्या लिंकवर क्लिक करावे. (Activation लिंक ही 2 दिवसांकरिता activate असेल.) उमेदवाराने त्याची/तिची लॉगइनची माहिती गोपनीय ठेवावी. एकदा खाते सक्रीय झाले की, उमेदवाराला त्यांच्या नोंदणी पोर्टलचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून केव्हाही लॉग ऑन होता येईल.

सर्वसाधारण सूचना :-


एक ) अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
(दोन) अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ :- https://mahabhumi.gov.in
तीन ) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
चार) आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
८. १ जिल्हा केंद्र निवड :-
८.१.१ प्रस्तृत परीक्षेकरीता विविध जिल्हा (परीक्षा) केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या- – परीक्षी योजना/ पध्दती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
८.४.२ अर्ज सादर करतानाचा जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
८.४.३ जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
८. ४.४ जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवासाच्या पत्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. याबाबत शासनाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम मानन्यात येईल.

वाचा   Recruitment For Various Posts In Agricultural Science Center Ahmednagar And Mumbai Municipal Corporation Fire Department 

Talathi Bharti Online Registration Process 2023

टीप: USERNAME आणि PASSWORD जतन करण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल.

२) उमेदवाराचे नाव, वडीलांचे, पतीचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी ही मुलभूत माहिती आहे जी उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल.

३) छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती कृपया उंची आणि रुंदी प्रत्येकी २०० pixel असलेले छायाचित्र स्कॅन करुन अपलोड करा आणि अर्जामध्ये अपलोड करा. प्रतिमेची उंची ६० पिक्सल आणि रुंदी १४० पिक्सल असावी. प्रतिमेचे आकारमान ३ KB ते ५० KB च्या दरम्यान असावे.

(टिप:- उमेदवाराने अलीकडील छायाचित्र (फोटोग्राफ) अपलोड करणे आवश्यक आहे.)

४) पत्ता टाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा. उदा. कायमस्वरुपी पत्ता, तात्पुरता पत्ता किंवा दोन्ही आणि त्यानुसार आपले गाव, पोस्ट ऑफिस, राज्य, जिल्हा, पिन कोड इ. सहित माहिती भरावी.

५) त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी. उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचारणा केली जाईल. असल्यास ड्रॉपडाऊन मधून त्याने / तिने आपला जात प्रवर्ग निवडावा. उमेदवार जर ST प्रवर्गात मोडत असेल तर त्यास तो ST-PESA प्रवर्गामध्ये अर्ज करू इच्छितो का नाही | याची निवड करावी लागेल. उमेदवार हा एका वेळी फक्त एका जिल्हासाठी अर्ज करू शकतो. जर आपण ST-PESA प्रवर्गातून अर्ज करत असाल तर आपण फक्त आपल्या ST-PESA जिल्हाच्या विभागासाठी | अर्ज करू शकता दुसऱ्या कुठल्याही विभागाकरिता ST-PESA मधून अर्ज करू शकत नाही. जर एका | उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केलेलं आहेत असे आढळून आल्यास त्याचा कालक्रमानुसार पहिला अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.

६) उमेदवाराने तलाठी या पदाकरिता अर्ज करत असताना त्याला ज्या जिल्ह्याच्या पदाकरिता अर्ज करावयाचा आहे तो जिल्हा काळजीपूर्वक निवडणे गरजेचे आहे. (इथे निवडत असलेला जिल्हा आणि तुम्ही तुमच्या | पत्त्यामध्ये निवडत असलेला जिल्हा यांचा कुठलाही संबंध नाही.

उमेदवाराने खाली नमूद केलेल्या फील्ड करीत जिल्ह्याची निवड करावी.

आपण अर्ज करू इच्छित असलेला जिल्हा निवडा.

आपण अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव या फील्ड मध्ये बदल केला जाणार नाही किंवा तशी विनंती स्वीकारली जाणार नाही.

वाचा   Recruitment For Various Posts In Maharashtra State Power Distribution Company Limited And Maharashtra State Cooperative Bank

६) ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती भरावी, तसेच उमेदवाराने आधार क्रमांक / आधार नोंदणी क्रमांक याबद्दलची माहिती द्यावी. समांतर आरक्षण (लागू असल्यास) त्यासंबंधीची माहिती द्यावी लागेल. मराठी भाषेतील प्राविण्य, MS-CIT प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, अपंगत्वाचा प्रकार लागू असल्यास) यासंबंधीची माहिती द्यावी लागेल.

८) शैक्षणिक माहितीच्या जागी उमेदवाराने आपली सविस्तर शैक्षणिक माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेमध्ये जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे माहिती देणे अनिवार्य आहे, तरच आपणास त्या पदासाठी अर्ज करता येईल.

एकदा शैक्षणिक तपशिल प्रविष्ट केले की अर्जदार पुढे या बटणावर क्लिक करावे लागेल, त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

१०) आता उमेदवारास पदाची निवड करावी लागेल. (तलाठी / Talathi)

११) त्यानंतर उमेदवारास सर्व पदांसाठी आवश्यक असलेली पात्रतेबद्दलची माहिती देऊन ती सेव्ह करणे आवश्यक आहे.

१२) उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परिक्षा केंद्राकरिता तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो. उमेदवाराने आपल्या अर्जात उपलब्ध करून देण्यात आलेल्या तीनही पसंतीक्रमाच्या यादीतील प्रत्येकी एका पर्यायांची निवड करणे आवश्यक आहे. तीनही पसंतीक्रमात उमेदवाराने निवडलेल्या पर्यायांपैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारास उपलब्ध केंद्रापैकी केंद्र नेमून देण्यात येईल.

१३) उमेदवाराने सगळया नियम व अटी वाचून मान्यता दर्शविण्यासाठी दिलेल्या जागी क्लिक करावे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने (इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड, भीम UPI) आवश्यक तो परीक्षा शुल्क भरणा करावा. मान्यता दर्शविल्यानंतरच अर्ज दाखल करण्यासाठीचा सबमिट हा पर्याय उपलब्ध होईल. उमेदवाराला त्याचा अर्ज डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याचा पर्याय असेल.

१४) ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेस मध्यरात्री १२.०० वाजल्यानंतर संकेतस्थळावरील लिंक बंद केली जाईल.

१५) जर कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा अधिक लॉगिन आयडीसह नोंदणी केली असेल तर उमेदवारांची पहिली यशस्वी नोंदणी फक्त पुढील प्रक्रिया जसे हॉल तिकीट, परीक्षेत उपस्थिती, गुणवत्ता यादी आणि अन्य संबंधित प्रक्रियांसाठी विचारात घेण्यात येईल, कोणत्याही डुप्लीकेट नोंदणीस अवैध नोंदणी मानले जाईल आणि कोणत्याही प्रकारचे पैसे परतफेड केले जाणार नाहीत

नोंद:- नोंदणी मधील तपशील जसे की वापरकर्ता नाव (USERNAME), ई मेल आयडी, प्रवर्ग आरक्षण (लागू, समांतर किंवा प्रवर्ग आरक्षण), पसंतीचे स्थान, जन्मतारीख उमेदवाराचे छायाचित्र (फोटोग्राफ) आणि स्वाक्षरी इत्यादी फॉर्म सादर केल्यानंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

How to Apply Online Maharashtra Talathi Application Form 2023|
Mandal Adhikari Bharti 2023 Application Fill

  1. Go To The official website of Maha Revenue and Forest Department –https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
  2. Search to the “Latest News” section on the home page.
  3. Click On a “Mahsul Vibhag Talathi & Mandal Adhikari Bharti 2023” Link
  4. Open Notification and Read each & every instruction carefully
  5. It would be helpful in avoiding any mistake at a later stage.
  6. Check Your eligibility after reading
  7. Fill up all the deatils fields without any Mistake
  8. Upload all Your Documents given
  9. Now Pay Talathi Application Form Fee 2023 as per Your category
  10. Now Take a Print Out Of Mahsul Vibhag Talathi Online Application Form 2023 for Future referance
वाचा   Recruitment In Indian Oil Corporation Limited Thane Municipal Corporation And Dr D Y Patil University Pune 

What is the expected date of Talathi exam 2023

तलाठी परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेतली जाईल.

परीक्षेचे स्वरुप

  1. परिक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
  2. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावर प्रश्नाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  3. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. प्रनिमं- २००९/प्र.क्र.३५६/ई-१०, दि.०१/०१/२०१० मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय,सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३ अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार या पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती घेण्यात येणार नाहीत.)

Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2023
CategoryExam Syllabus
Recruitment NameTalathi Exam 2023
NameMaharashtra Talathi Syllabus 2023
PostTalathi
Vacancy4644
talathi bharti 2023; how to apply? and how to preparation?

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 Syllabus – मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, तलाठी(म्हणजेच पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो.

सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.  गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो. आज या लेखात आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे. तसेच जर आपण तलाठी भरतीची तयारी करत असाल, तर या लिंक वरून आपण मोफत रजिस्टर करून रोज नवीन सराव पेपर्स सोडवू शकता. या सर्व टेस्ट सिरीज महाभरती वर मोफत उपलब्ध आहेत.

Maharashtra Talathi Bharti Syllabus in Marathi

तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.

अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी/अंकगणित2550
एकूण100200
talathi bharti 2023; how to apply? and how to preparation?

महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 | talathi syllabus 2023 in marathi pdf

Maharashtra Talathi Syllabus 2023: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.

अ क्रविषयतपशील
1EnglishGrammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2मराठीमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक तत्समशब्द
एका वाक्या साठी एक शब्द, उलटशब्द, व्याकरण, लिंग
3सामान्य ज्ञानइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
4बौद्धिक चाचणीबुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)
अंकगणित  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)
talathi bharti 2023; how to apply? and how to preparation?

पावसाळ्यावरील 5 छोटे निबंध

राजर्षी शाहू महाराज जयंती

quiz;EFLU, MPSP,SCERT  Work in the field of education 

मध्यान भोजन कैलकुलेटर 2023(रोजचे धान्य व धान्यादी मालाचे प्रमाण काढण्याकरीता उपयुक्त)

Categories job

Leave a Reply

गुगल 25 वा वाढदिवस-मराठीत प्रश्नमंजुषा मुद्दत – शेवट ची तारीख 31 ऑक्टोबर 2023 (jnv-9) जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25 गणेश चतुर्थी 2023 साठी शुभेच्छा उद्धरण प्रतिमा मुद्दत वाढ पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023
गुगल 25 वा वाढदिवस-मराठीत प्रश्नमंजुषा मुद्दत – शेवट ची तारीख 31 ऑक्टोबर 2023 (jnv-9) जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25 गणेश चतुर्थी 2023 साठी शुभेच्छा उद्धरण प्रतिमा मुद्दत वाढ पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023
%d bloggers like this: