शाळा प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे, 'या' नवीन मार्गदर्शक सूचना वाचा

तुम्ही आपल्या पाल्यासाठी शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. ( Maharashtra News) तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही.

(School Admission News)  कारण आता शाळा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, हे करण्यासाठी शाळांना चाप लावण्याचा सरकारचा विचार आहे. पण याचा त्रास्त हा पालकांना होणार असल्याची चर्चा आहे.  ( Aadhaar card now mandatory for school admission)

बनावट पटसंख्या दाखवून अनेक शाळा कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याच समोर आले आहे.

अशा गैरव्यवहार करणाऱ्या शाळांना चाप बसवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनाही आधार कार्ड सक्ती असल्याचं आदेशात म्हटले आहे.

शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचे आधार कार्डदेखील लिंक केले जाणार आहे. बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही 'आधार'ची सक्ती करण्यात आली आहे.

शाळा प्रवेशाबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना -