सदर सेतू अभ्यास मराठी व उर्दू व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्या
मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या २० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात याची.
सदर कृतिपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे.
काही विषयातील अधिक माहिती घेऊ या मधील प्रश्न विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.