सेतू अभ्यास 2023 ; कसे असेल ?

सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत.

तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.

इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.

सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत.

विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

सेतू अभ्यास 2023  पूर्व चाचणी डाउनलोड करा