हिवाळ्या माध्ये आपण आपल्या त्वचे ची काळजी घेता काय ? हे घरगुती उपाय करून पहा!

Photo by Ilyuza Mingazova on Unsplash

हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात. त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते

हिवाळ्यात त्वचेत आर्द्रतेची कमतरता असते. अशा परिस्थितीत त्वचेला मॉइश्चरायझेशन ठेवणे आवश्यक आहे. त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे.

त्वचा केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही चमकदार बनवणे महत्त्वाचे आहे. यासाठी संतुलित आहाराची दिनचर्या पाळली पाहिजे.

हिवाळ्यात घाम लवकर बाहेर पडत नाही आणि अशा स्थितीत त्वचेची छिद्रे बंद होतात आणि त्वचेवर निस्तेजपणा येऊ शकतो. छिद्र स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे हिवाळ्यातही व्यायाम करावा, कारण त्यामुळे घाम येईल आणि त्वचेची घाण बाहेर पडू शकेल.

स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी हिवाळ्यातही तुम्ही किमान तुमच्या शरीराला आवश्यक असेल तितकं आठ ग्लास पाणी पिण्याची गरज आहे. पाणी जास्त प्यायल्याने त्वचा कोरडी पडत नाही. तुमच्या शरीराला आवश्यक ते पोषण मिळून त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.

जेव्हा तुम्ही त्वचा पाण्याने स्वच्छ धुता तेव्हा चेहरा रगडून धुवू नका. तसंच चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने घसाघसा पुसू नका. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अधिक कोरडेपणा येतो आणि बॅक्टेरियाचा अधिक त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. तुम्ही नेहमी स्वच्छ टॉवेलचाच उपयोग करा.

गरम पाण्यामुळे त्वचा आणखी कोरडी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कोमट अथवा थंड पाण्याचा वापर करावा. त्वचेला लगेचच मॉईश्चरायझ करा, जेणेकरून त्वचेतील ओलावा निघून ती कोरडी पडणार नाही.

अश्याच प्रकारच्या  सवास्थ्य टिप्स पाहण्या करिता खालील learn more बटन वर क्लिक करा.