राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे.
ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ५६३ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १९३४६ शाळा व एकूण १९६७५० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. १२ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.