राज्यातील वीज कर्मचारी 3 दिवस संपावर जाणार

काय आहे वीज कर्मचाऱ्यांचे  जनतेपुढे नम्र आवाहन ?

4,5,6 जानेवारी 2023 ला राज्यातील वीज कर्मचारी 3 दिवस संपावर जाणार 

जर वीज कर्मचारी संपावर गेले तर राज्यातील सर्व वीज ग्राहकांची वीज खंडित होणार ?

वीज कर्मचारी संपावर जाण्याचे कारण काय ? तर ....

राज्यातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण केले जाणार आहे. अदानी ग्रुपसोबत करार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांना मिळाल्याने त्यांनी त्यास विरोध सुरू केला आहे.

वीज कंपन्यांच्या जवळपास 30 संघटनांनी यामध्ये पाठिंबा दिला असून सरकारने खाजगीकरन करू नये अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे.

आज मध्यरात्री म्हणजेच 03 जानेवारीच्या रात्री 12 वाजेनंतर 72 तासासाठी हे सर्व कर्मचारी संप करणार आहे. यावेळी कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नाही.

त्यामुळे संपा दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील नागरिक चिंतेत आहे.

वीज कर्मचारी संघटनेने जनतेपुढे भावनिक आवाहन  केले आहे जो whatsapp वर viral होत आहे. 

72 तासांच्या संपात सरकारने निर्णय मागे घेतला नाहीतर बेमुदत संप पुकारण्याची हालचाल वीज कंपन्यांचे कर्मचारी करीत आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारची भूमिका महत्वाची असणार आहे.