शेवटी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना स्वगृही जाण्याचा मार्ग मोकळा

सन २०१७ ते २०२२ या कालावधीत संगणकीय प्रणाली द्वारे online पद्धतीने  आंतरजिल्हा बदली झालेल्या व अध्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार

जिल्ह्यातून बाहेर जाण्या करिता जिल्ह्यातील रिक्त पदांची टक्केवारी 10% पेक्षा कमी असणे गरजेचे असल्याचे शासनाच्या धोरणात नमूद आहे.

ज्या जिल्हा परिषदे तील रिक्त पदांची टक्केवारी 10 % पेक्षा जास्त आहे . अशा जिल्ह्य परिषद शिक्षकांना  हि कार्यमुक्त करण्यात येणार आहे.

अशा शिक्षकांना बदली वर्ष व विद्यमान जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठता विचारात घेतली जाणार.

शिक्षकांना कार्यमुक्त केल्या मुळे ज्या शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे अधिक आहेत , अशा शाळांमध्ये अंतर्गत नेमणूकी द्वारा शिक्षकांची व्यवस्था करण्यात येणार.

कार्यमुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकांची संख्या विचारात घेऊन शिक्षक  भरती  प्रक्रिया पार पडणार .

पवित्र प्रणाली द्वारा नवीन शिक्षक भरती होणार.

दिनांक ०१/०४/२०२३ ते ३०/०४/२०२३ पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्ती बाबत चे प्रशासकीय आदेश निर्गमित करण्यात येणार . व कोणत्याही परिस्थितीत ०१/०५/२०२३ ते ३१/०५/२०२३ या कालावधीत शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार.

हि आंतरजिल्हा कार्यमुक्त प्रक्रिया फक्त २०१७ ते २०२२ मधील online प्रक्रिया मध्ये बदली झालेल्या शिक्षकांसाठी आहे.