एक हसरा चेहरा व उमदा कलाकार  -प्रदीप पटवर्धन , काळाच्या पडद्या आड 

मराठी मनोरंजन विश्वाला धक्का देणारी बातमी मंगळवार ०९ ऑगस्ट रोजी समोर येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेते  प्रदीप पटर्वधन   यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे

ते 64 वर्षांचे होते. हा अभिनेता त्याच्या थिएटरमधील कामासाठी लोकप्रिय होता, 

सर्वात लोकप्रिय मोरुची मावशी. मराठी चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही त्यांनी भूमिका केल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदीप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

त्यांनी लिहिले की,  “मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाने एक महान कलाकार गमावला आहे.

एक फुल चार हाफ (१९९१),  चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध,पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या

अश्या ह्या हरहुन्नरी कलाकाराला मराठी वर्ग तर्फे  🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏