भारतात दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) म्हणून साजरा केला जातो.
देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे.
आझाद हे स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री (1947 ते 1958) होते. आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले होते.
11 सप्टेंबर 2008 रोजी केंद्र सरकारने अबुल कलाम आझाद यांची जयंती 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
तेव्हापासून देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.
शिक्षण मंत्रालयाने आझाद यांच्या नेतृत्वाखाली 1951 मध्ये देशातील पहिली IIT स्थापन केली.
मौलाना अबूल कलाम आझाद विषयी महत्वाची माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.