भारत सरकारच्या ULLAS नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याजनन चाचणी (FLNAT) 2025 आयोजित करण्यात येत आहे.
ही परीक्षा 23 मार्च 2025 रोजी होणार असून, महाराष्ट्र राज्यातही मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जाईल.
या परीक्षेच्या आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण सूचना आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत.
ULLAS नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 15 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना मूलभूत साक्षरता (वाचन, लेखन व संख्याजनन) प्राप्त करून देणे हा मुख्य उद्देश आहे.
याशिवाय आर्थिक साक्षरता, कायद्याबद्दलची माहिती, डिजिटल साक्षरता, आरोग्य जागरूकता इत्यादी महत्त्वाच्या कौशल्यांचा समावेश आहे.
– परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली या भाषांमध्ये घेतली जाईल.
महत्त्वाच्या सूचना आणि नियम: