दिनांक १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याने पवित्र – शिक्षक भरती 2022 ची प्रथम पायरी सुरु केली आहे .
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करणेसाठी आवश्यक कागदपत्राची यादी
उमेदवाराने TAIT 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र. उमेदवाराने TAIT 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
जातीचा दाखला / जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) 5. जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास) 6. समांतर आरक्षणासाठी A) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) B) माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास) C) पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र (लागू असल्यास)
D) प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास) E) भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास) F) प्राविण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचे बाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती (लागू असल्यास) G) अनाथ असल्याचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका. 8. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका. 9. शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास) 10. शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका ( लागू असल्यास)