आज आपण विविध पेमेंट एप द्वारा आपला वीज बिल भरणा करीत आहोत.
एकदा आपण त्या पेमेंट एप द्वारे वीज बिल भरला की दर वेळी त्या पेमेंट एप द्वारा नवीन वीज बिल ची नोटिफिकेशन येत राहते.
नोटिफिकेशन त्या एप मध्ये , व्हाट्स एप्प द्वारा किंवा टेक्स्ट मेसेज मधून वीज भरणे संधर्भात लिंक देखील पाठवली जाते.
किंवा एक मोबाइल नं. दिले जाते व call करण्यास सांगतात
call न केल्यास तुमची वीज बंद कण्यात येईल असा मेसेज देखील पाठवला जातो.
अशा परिस्थितीत जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर सर्वप्रथम तो मेसेज व्हेरिफाईड आयडी किंवा कोणत्या मोबाईल नंबरवरून पाठवला गेला आहे हे तपासा.
जर तो मेसेज एखाद्या नंबरवरून पाठवला असेल तर तो फेक आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. - अशा मेसेजमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कधीही संपर्क करू नका.
तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील कोणाशीही शेअर करू नका. अन्यथा, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.