प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते.
सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये
सदरच्या पात्र सर्व शिक्षक /मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्प्यामध्ये पूर्ण करू शकणार आहेत.
सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login या लिंकवर क्लिक करून आपणास सुरु करता येईल.
सदरचे प्रशिक्षण हे पात्र प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १० जुलै, २०२३ पासून २४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे.
प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ४५ दिवसांच्या कालावधी मध्येच पूर्ण करणे अनिवार्य आहे.
तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही, याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये Infosys Springboard या नावाचे अॅप्लीकेशन प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून सदरच्या अॅपद्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे अॅप्लीकेशन हे