८ लाख ११ हजार खात्यांवर युजरकडून तक्रार येण्यापूर्वीच बंदी घालण्यात आली, असे व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यासाठीच्या माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत येणाऱ्या भारतीय मासिक अहवालात म्हटले आहे.
गेल्या वर्षी अमलात आलेल्या सक्त आयटी नियमांमुळे मोठ्या डिजिटल प्लाटफॉर्म्सना (५० लाखांपेक्षा अधिक युजर्स असलेले) दर महिन्याला अनुपालन अहवाल प्रकाशित करणे सक्तीचे झाले आहे.
यामध्ये डिजिटल प्लाटफॉर्म्सना तक्रारी आणि त्यावर केलेली कारवाई याची माहिती द्यावी लागते.