राज्यातील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना विविध योजना, धोरणे, परिपत्रके, प्रशिक्षणे, स्पर्धा, सर्वेक्षण व इतर अनुषंगिक माहिती तात्काळ उपलब्ध होणेबाबत तयार करण्यात आलेल्या टेलिग्राम चॅनेलला
शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांसाठी,
शिक्षकांसाठी विविध योजना याचसोबत शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन, विविध राष्ट्रीय, राज्य स्तरीय शैक्षणिक सर्वेक्षणे (उदा. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण इत्यादी),
विविध शैक्षणिक योजना, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय, राज्य स्तरावरून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा, विविध ऑनलाईन उपक्रम,
विविध उपक्रमांच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजन, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरावरील विविध स्पर्धा,
उपक्रम, विविध शैक्षणिक कार्यक्रम व त्यांची वेळापत्रके इत्यादी अशा अनेक अनुषंगिक बाबींसाठी राज्यस्तरावरून विभागस्तरावर/जिल्हास्तरावर/तालुकास्तरावर पत्र व्यवहार केला जातो.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकांना एकाच वेळी व तात्काळ उपलब्ध व्हावे यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत टेलीग्राम चॅनेल सुरु करण्यात येत आहे.