1st telegram channel of scert pune

Spread the love

1st telegram channel of scert pune

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे अधिकृत telegram चॅनेल

राज्यातील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना विविध योजना, धोरणे, परिपत्रके, प्रशिक्षणे, स्पर्धा, सर्वेक्षण व इतर अनुषंगिक माहिती तात्काळ उपलब्ध होणेबाबत तयार करण्यात आलेल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होणेबाबत ….

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांसाठी, शिक्षकांसाठी विविध योजना याचसोबत शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन, विविध राष्ट्रीय, राज्य स्तरीय शैक्षणिक सर्वेक्षणे (उदा. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण इत्यादी), विविध शैक्षणिक योजना, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय, राज्य स्तरावरून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा, विविध ऑनलाईन उपक्रम, विविध उपक्रमांच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजन, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरावरील विविध स्पर्धा, उपक्रम, विविध शैक्षणिक कार्यक्रम व त्यांची वेळापत्रके इत्यादी अशा अनेक अनुषंगिक बाबींसाठी राज्यस्तरावरून विभागस्तरावर/जिल्हास्तरावर/तालुकास्तरावर पत्र व्यवहार केला जातो.

1st telegram channel of scert pune

राज्यस्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने उपरोक्त बाबींची माहिती शाळास्तरावर अथवा शिक्षकांपर्यंत काहीवेळेस तत्काळ उपलब्ध होतेच असे नाही. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राज्यस्तरावरील अशा स्वरुपाची महत्वाची शैक्षणिक माहिती, पत्रव्यवहार, तसेच शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रसिद्धी देण्याच्या दृष्टीने घेण्यात येणारे उपक्रम यांची

माहिती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकांना एकाच वेळी व तात्काळ उपलब्ध व्हावे यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत टेलीग्राम चॅनेल सुरु करण्यात येत आहे. सोबतच्या लिंक वर क्लिक करून अथवा QR कोड स्कॅन करून राज्यातील इ. १ ली ते इ. १२ वी चे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य सदरच्या टेलीग्राम चॅनेल मध्ये सहभागी होऊ शकतात. (paripatrak )

तरी आपल्या कार्यक्षेत्रामधील सर्व शिक्षकांना याबाबत अवगत करण्यात यावे, जेणेकरून राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यापर्यंत शालेय शिक्षण विभागाचे उपक्रम अथवा माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल.

1st telegram channel of scert pune
1st telegram channel of scert pune

1st telegram channel of scert pune

telegram channel https://t.me/MhTeachers

face book https://t.me/MhTeachers

twitter https://t.me/MhTeachers

youtube https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw

read this also…

Leave a Reply

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह