आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येणार आधार आणि पॅन कार्ड

भारत सरकारचे ई-गव्हर्नन्स पोर्टल MyGov Helpdesk वरून तुम्ही अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता.

यामध्ये डिजीलॉकरच्या मदतीने पॅन आणि आधार देखील सहज डाऊनलोड करता येणार आहे.

लोकांना डिजीलॉकरच्या विविध सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर चॅटबॉटही सुरू करण्यात आला आहे.

याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवरच आधार आणि पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता.

याद्वारे प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर नेले जाईल आणि त्यानंतर तुम्ही आधार आणि पॅन सहजपणे डाऊनलोड करू शकाल.

– WhatsApp द्वारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे नमूद केलेल्या स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता. – सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर WhatsApp ओपन करा. – 9013151515 मोबाईल नंबर कोणत्याही नावाने सेव्ह करा. – आता या नंबरवर "हॅलो" चा मेसेज करा. – चॅटबॉट तुम्हाला "डिजिलॉकर सर्व्हिसेस" किंवा "को-विन सर्व्हिसेस" यापैकी एक निवडण्यास सांगेल. – तुम्ही ऑप्शनमध्ये DigiLocker निवडा.

पॅन आणि आधार कार्ड कसे डाऊनलोड कराल?

– तुमचे डिजिलॉकर खाते आहे का? विचारल्यास 'हो' पाठवा. – आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल. – यानंतर, सर्व लिंक केलेल्या सेवा स्क्रीनवर दिसतील. – आधार आणि पॅनच्या पर्यायातून नोंदणी क्रमांक फाईलवर क्लिक करा. – यानंतर चॅटबॉट तुम्हाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची PDF पाठवेल, जी तुम्ही डाऊनलोड करू शकता.

पॅन आणि आधार कार्ड कसे डाऊनलोड कराल?

घरातील वृद्ध व्यक्तींकरिता या हिवाळ्यात घ्यावयाची काळजी वाचा 

या हिवाळ्या मध्ये आपल्या त्वचे ची निगा काशी राखाल