इयत्ता ५वि व ८वी शिष्यवृत्ती प्रवेश पत्र डाउनलोड करा व सूचना पहा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.

परीक्षेकरिता प्रवेश पत्र परिषदेच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे . https://2023.mscepuppss.in

तरी सर्व शाळा मुख्याध्यापक आपल्या शाळा लॉगिन वरून विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता .

विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्यांचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक, दिव्यांग व आरक्षणाचा प्रवर्ग या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्याच्या नावासमोरील Imp Edit या बटनावर क्लिक करावे. तसेच इतर माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करावे.

विद्यार्थी शिकत असलेल्या अभ्यासक्रम या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह puppsshelpdesk@gmail.com या हेल्पलाईन इमेलला विनंती अर्ज सादर करावा.

परीक्षे करिता परिषदेने विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी काही सूचना केलेले आहेत त्याचे पालन जरूर करा.

परीक्षे करिता परिषदेने  पालकांसाठी काही सूचना केलेले आहेत त्याचे पालन जरूर करा.

best android apps for 5th scholarship examination (Marathi)

best android apps for 5th scholarship examination (Marathi)