इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती प्रवेश पत्र डाउनलोड करा व सूचना पहा |Download Class 5th & 8th Scholarship Admit Card and Check Instructions

Spread the love

Download Class 5th & 8th Scholarship Admit Card and Check Instructions

इयत्ता ५वि व ८वी शिष्यवृत्ती प्रवेश पत्र डाउनलोड करा व सूचना पहा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.

या परीक्षेकरिता प्रवेश पत्र परिषदेच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे . तरी सर्व शाळा मुख्याध्यापक आपल्या शाळा लॉगिन वरून विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता .

या परीक्षे करिता परिषदेने विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी काही सूचना केलेले आहेत त्याचे पालन जरूर करा.

वाचा   5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024|5th and 8th scholarship exam will be on 18 feb 2024 apply now

for admit card visit https://2023.mscepuppss.in/LoginPage.aspx

examdate
pup/pss 2023 इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा
application date16/11/2022 to 31/12/2022
admit card released datefirst week of feb.2023
exam date 12/02/2023
Download Class 5th & 8th Scholarship Admit Card and Check Instructions

परीक्षार्थ्यांसाठी सूचना :-

01) परीक्षार्थ्याने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड – 19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे (मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग इत्यादी) पालन करून सकाळी 10:00 वाजता परीक्षा केंद्रावर हजर रहावे.

02) परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर परीक्षागृहात प्रवेशपत्रासह उपस्थित रहावे.

03) उत्तरे नोंदविण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर आणि प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

04) परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपरच्या वेळी उत्तरपत्रिका आणि स्वाक्षरीपटावर विहित ठिकाणी स्वाक्षरी करावी.

05) पेपर चालू असताना प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत इतर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांचेशी चर्चा करू नये.

06) कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तके, टॅब, पेजर व तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षागृहात आणण्यास सक्त मनाई आहे.

वाचा   educational calendar for December 2020 to April 2021 class one to ten; download now

07) उत्तरे नोंदविण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा.

08) परीक्षार्थ्याने पेपर संपल्यानंतर कार्बनलेस उत्तरपत्रिकेची मूळ प्रत ( Original Copy) पर्यवेक्षकाकडे जमा करावी तसेच उमेदवाराची प्रत (Candidate Copy) व प्रश्नपत्रिका आपल्यासोबत घेऊन जावी.

09) उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिका संचकोड अचूक नोंदवून त्याबाबतचे अचूक वर्तुळ रंगविणे आवश्यक आहे.

10) उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाणार असल्याने ती फाटणार नाही अथवा चुरगळणार नाही याची दक्षता घ्यावी.

11) उत्तरपत्रिका फाटल्यामुळे उत्तरपत्रिकेवर रंगविलेले पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत.

Download Class 5th & 8th Scholarship Admit Card and Check Instructions
Download Class 5th & 8th Scholarship Admit Card and Check Instructions

शाळा व पालकांसाठी सूचना :-

01) प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्राच्या पत्त्याबाबत काही अडचण असल्यास परीक्षेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षण विभागाशी (शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई म.न.पा. / शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई (प./द. /उ.) / प्रशासन अधिकारी म.न.पा. / गटशिक्षणाधिकारी पं.स.) संपर्क साधावा.

02) परीक्षार्थ्यांकडून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोडविण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा.

03) प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी / चुका आढळून आल्यास त्याबाबतचे निवेदन लेखी स्वरूपात न पाठवता अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर विहित मुदतीत संबंधित शाळेच्या लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीनेच भरून पाठवावे.

वाचा   setu abhyas 2023-24: weekly online test class 2 to 7

04) परीक्षेनंतर निकालाच्या कार्यवाहीचे टप्पे :- अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करणे आक्षेप मागवून अंतिम उत्तरसूची घोषित करणे अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित करणे त्यावर आक्षेप मागवून अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करणे.

05) प्रवेशपत्रावरील शाळेच्या अथवा परीक्षार्थ्याच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास संबंधित मुख्याध्यापकाच्या पत्रान्वये तात्काळ परीक्षा परिषदेस कळवावे. जेणेकरून निकालापूर्वी आवश्यक बदल करता येईल. अंतिम निकालानंतर कुठलीही तक्रार स्वीकारली जाणार नाही.

06) परीक्षा परिषदेच्या https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केलेली माहिती व सूचना नियमितपणे काळजीपूर्वक वाचाव्यात.

07) प्रवेशपत्र व उत्तरपत्रिकेची Candidate Copy परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत जतन करून ठेवावी.

हे ही पहा …

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८वी -२०२२ गुणवत्ता यादी जाहीर

best android apps for 5th scholarship examination (Marathi)

Leave a Reply

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
%d