शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8 वी 

Tilted Brush Stroke

गुणपडताळणी

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला आहे ते पाहण्या करिता खालील learn more बटन क्लिक करा . 

जर आपल्या प्राप्त गुणांबद्दल तुम्हाला शंका आहे तर ... आपण आपल्या गुणांची पडताळणी करून घेवू शकता  . कसे ते पहा ... पुढच्या स्लाईड वर

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ०७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने उत्तरपत्रिकेची छायाप्रत अथवा डिजीटल स्कॅन कॉपी देण्यात येणार नाही.

गुणपडताळणी करणेबाबत विहित मुदतीनंतर अथवा ऑफलाईन पद्धतीने केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दिनांक 17/11/2022 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.

विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.