pup-pss 2022 exam interim result check it now

Spread the love

pup-pss 2022 exam interim result check it now

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)

अंतरिम निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवार, ०७ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं. ०६.०० वाजता www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे.

for student

with use of school login

शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ०७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी । ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. १७/११/२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

Leave a comment

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 100 शुभेच्छा संदेश मराठीत दिवाळी सुट्टीच्या शुभेच्छा: विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 100 शुभेच्छा संदेश मराठीत दिवाळी सुट्टीच्या शुभेच्छा: विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025