चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात.. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात.. पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात… “आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!!
सर्वात मोठं वास्तव.. लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र, लगेच विश्वास ठेवतात…
विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा, कुठेतरी काही चांगले घडत असते…
खिश्यात कितीही नोटा आल्या तरी नशिबाचा टॉस करायला रुपायाच लागतो पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआप कट होतो! वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात… त्या नक्कीच संपतात!!!!