राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे.
ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७३० केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३५३१ शाळा व एकूण २६६२१५ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. 11 डिसेंबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २३.१२.२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.