आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२२-२३

परीक्षा १८ डिसेंबर २०२२ ऐवजी २१ डिसेंबर रोजी होणार 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणार होते .

पण काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा २१ डिसेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. 

सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे,

त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

पात्रता विद्यार्थ्यांची निवड :- परीक्षेचे वेळापत्रक :- परीक्षेसाठी विषय माध्यम : आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या सविस्तर माहिती व व रजिस्ट्रेशन साठी  क्लिक करा