National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2022-23) apply now

Spread the love

National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2022-23) apply now

आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२२-२३

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे.

(NMMS) २०२२-२३

सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल. १. अर्ज करण्याची पध्दत :- दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या

वाचा   National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2020-21)

https://www.mscepune.in/व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

nmms school registraion click here
nmms – scool login click here
school instruction click here
nmms flow chart click here
pres note click here

पात्रता :

१) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता

८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या

परीक्षेस बसता येते.

२) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

3) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत.

  • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी,
  • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी. •
  • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
  • शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
  • सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी,

विद्यार्थ्यांची निवड :-

  • विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील
  • गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
वाचा   राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्याची निवड यादी|National Scholarship Scheme for Economically Weaker Students Selection List of Students Eligible for Examination Scholarship 2023

परीक्षेचे वेळापत्रक :-

महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.विषयाचे नावएकूण गुण एकूण प्रश्न कालावधीवेळपात्रता गुण (एकत्रित)
बौध्दिक क्षमता चाचणी
Mental Abilily Test
(MAT)
९० ९० दीड तास
(फक्त दृष्टी
अपंगांसाठी ३०
मिनिटे जादा वेळ)
१०.३० ते १२;०० ४०%
विश्रांती १२.३० ते १३.३०
शालेय क्षमता चाचणी
scholastic aptitude test
(SAT)
९० ९० दीड तास
(फक्त दृष्टी
अपंगांसाठी ३०
मिनिटे जादा वेळ)
१३.३० ते १५ .०० ४०%

* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.

परीक्षेसाठी विषय

सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

  • बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
  • शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५) ३. गणित (एकूण गुण – २०) असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
वाचा   nmms 2021 selection list Maharashtra

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

  • सामान्य विज्ञान ३५ गुण :- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
  • समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
  • गणित २० गुण,

माध्यम :

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या

अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोठा निश्चित करुन दिलेला आहे. कोठयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्हयासाठीचा कोठा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यातयेतील.

शुल्क

परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

तपशीलदिनांकशुल्कशाळा संलग्नता फी
ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे१०/१०/२०२२ ते
३१/१०/२०२२
१२०/संलग्लता फी रु २००
प्रति संस्था
शैक्षणिक वर्षासाठी
ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे०१/११/२०२२
ते ०५/११/२०२२
२४०
ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे
(शाळा/संस्था जबाबदार असेल तर)
०६/११/२०२२
ते ११/११/२०२२
३६०/
(४८०/)

निकाल घोषित करणे :-

सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती दर

शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास ५ वर्षांसाठी दरमहा रु. १,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

  • शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वीतून इ. १०वी व इ. ११ वीतून इ. १२ वीप्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.
  • इ.१० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५%गुणांची आवश्यकता आहे.)
  • सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक(माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
%d bloggers like this: