इयत्ता ५वी  व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 शाळा व पालकांसाठी सूचना

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.

परीक्षेकरिता प्रवेश पत्र परिषदेच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे . https://2023.mscepuppss.in

तरी सर्व शाळा मुख्याध्यापक आपल्या शाळा लॉगिन वरून विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता .

शाळा व पालकांसाठी सूचना

प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्राच्या पत्त्याबाबत काही अडचण असल्यास परीक्षेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षण विभागाशी (शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई म.न.पा. / शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई (प./द. /उ.) / प्रशासन अधिकारी म.न.पा. / गटशिक्षणाधिकारी पं.स.) संपर्क साधावा.

शाळा व पालकांसाठी सूचना

परीक्षार्थ्यांकडून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोडविण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा.

शाळा व पालकांसाठी सूचना

प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी / चुका आढळून आल्यास त्याबाबतचे निवेदन लेखी स्वरूपात न पाठवता अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर विहित मुदतीत संबंधित शाळेच्या लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीनेच भरून पाठवावे.

शाळा व पालकांसाठी सूचना

परीक्षेनंतर निकालाच्या कार्यवाहीचे टप्पे :- अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करणे आक्षेप मागवून अंतिम उत्तरसूची घोषित करणे अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित करणे त्यावर आक्षेप मागवून अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करणे.

शाळा व पालकांसाठी सूचना

प्रवेशपत्रावरील शाळेच्या अथवा परीक्षार्थ्याच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास संबंधित मुख्याध्यापकाच्या पत्रान्वये तात्काळ परीक्षा परिषदेस कळवावे. जेणेकरून निकालापूर्वी आवश्यक बदल करता येईल. अंतिम निकालानंतर कुठलीही तक्रार स्वीकारली जाणार नाही.

शाळा व पालकांसाठी सूचना

इतर सूचना पहा  खालील learn more बटन क्लिक करून

best android apps for 5th scholarship examination (Marathi)