देशभरातील पारंपरिक विद्यापीठांमधून दोन वर्षे कालावधीचा नियमित बी.एड. शिक्षणक्रम सुरू आहे.
नियमित बी.एड. शिक्षणक्रम सेवांतर्गत शिक्षकांना करता येणे शक्य नाही.
त्यामुळे मुक्त विद्यापीठाने सेवांतर्गत शिक्षकांसाठी नोकरी करताना पूर्ण करता येईल असा २ वर्षे कालावधीचा ‘सेवांतर्गत शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम‘ (बी.एड.) १९९१ पासून सुरू केला.
कालावधी – या शिक्षणक्रमाचा किमान कालावधी २ वर्षांचा व कमाल कालावधी ५ वर्षांचा आहे. कमाल पाच वर्षांच्या कालावधीत शिक्षणक्रम पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यास कमाल कालावधी संपल्याच्या दिवसापासून, पुन्हा पाच वर्षांसाठी त्या वर्षाच्या तुकडीचे संपूर्ण शुल्क भरून पुननोंदणी करता येईल.
एकूण श्रेयांक – हा शिक्षणक्रम १२० श्रेयांकांचा म्हणजे सुमारे ३६०० अध्ययन तासांचा आहे. (एक श्रेयांक म्हणजे ३० ते ३५ तासांचा अभ्यास होय.)
शिक्षणक्रम माध्यम अध्ययन साहित्य मराठीत आहे.