शिक्षणशास्त्र पदविका (बीएड) प्रवेश|ycmou bed 2023-25 admission started

Spread the love

ycmou bed 2023-25 admission started

यशंवत राव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ- शिक्षणशास्त्र पदविका (बीएड) p80 प्रवेश २०२३-२५

देशभरातील पारंपरिक विद्यापीठांमधून दोन वर्षे कालावधीचा नियमित बी.एड. शिक्षणक्रम सुरू आहे. नियमित बी.एड. शिक्षणक्रम सेवांतर्गत शिक्षकांना करता येणे शक्य नाही. त्यामुळे मुक्त विद्यापीठाने सेवांतर्गत शिक्षकांसाठी नोकरी करताना पूर्ण करता येईल असा २ वर्षे कालावधीचा ‘सेवांतर्गत शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम‘ (बी.एड.) १९९१ पासून सुरू केला.

बी.एड.२०२३-२५ शिक्षणक्रमासंबंधी माहिती

(२.१) कालावधी – या शिक्षणक्रमाचा किमान कालावधी २ वर्षांचा व कमाल कालावधी ५ वर्षांचा आहे. कमाल पाच वर्षांच्या कालावधीत शिक्षणक्रम पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यास कमाल कालावधी संपल्याच्या दिवसापासून, पुन्हा पाच वर्षांसाठी त्या वर्षाच्या तुकडीचे संपूर्ण शुल्क भरून पुननोंदणी करता येईल.

(२.२) एकूण श्रेयांक – हा शिक्षणक्रम १२० श्रेयांकांचा म्हणजे सुमारे ३६०० अध्ययन तासांचा आहे. (एक श्रेयांक म्हणजे ३० ते ३५ तासांचा अभ्यास होय.)

(२३) शिक्षणक्रम माध्यम अध्ययन साहित्य मराठीत आहे.

अभ्यासक्रम शिक्षणशास्त्र पदविका (बीएड) p80
सेवांतर्गत शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम
अभ्यासक्रम कालावधी २०२३-२५
शिक्षणक्रमाचा कालावधीकिमान २ वर्षे कमाल ५ वर्षे
अर्ज करण्याची मुद्दत २१/०८/२०२३ ते १२/०९/२०२३ (रात्री ११.५९) पर्यंत
शुल्क खुला प्रवर्ग (1000/-) राखीव प्रवर्ग (500/-)
अर्ज कसे करावे फक्त online
अधिकृत संकेत स्थळ https://ycmou.digitaluniversity.ac/

बी.एड. प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना(ycmou bed 2023-25 admission started)

★ महत्त्वपूर्ण सूचना

१)उमेदवाराने या शिक्षणक्रमाची प्रवेश माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे या शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरावा. त्याखाली असलेल्या प्रवेश लिंक वरून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल. ऑनलाईन प्रवेशअर्ज भरताना आपण भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री उमेदवाराने करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात नंतर कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही. याची नोंद घ्यावी. प्रवेश अर्जात भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करूनच ‘Submit बटण दाबावे.

वाचा   History and Recipes of Khamang Kothimbir Wadi

२) प्रवेशअर्ज भरण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर तीन दिवस स्वतःच्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची संधी (स्वयं संपादन) उमेदवाराला देण्यात येईल. या मुदतीतच उमेदवाराने प्रवेश अर्जात आवश्यक ती दुरुस्ती करावी.

३) २०२३ – २५ बी.एड. तुकडीचा प्रवेश अर्ज भरण्यासाठी सेवा अनुभव दि. ३० एप्रिल २०२३ पर्यंत नोंदविता येईल. या तारखेनंतरचा सेवा अनुभव यावर्षीच्या प्रवेशासाठी विचारात घेतला जाणार नाहीत.

४) ऑनलाईन प्रवेशअर्जात भरलेल्या संपूर्ण माहितीचे मूळ पुरावे पडताळणीवेळी आपणाकडे असणे अनिवार्य असेल. मूळ कागदपत्र सादर न केल्यास संबंधित माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. ५) बी एड. प्रवेश अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु.५००/- आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.

६) ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जातील माहिती आधारे खुला व आरक्षित वर्गाची केंद्रनिहाय कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार गुणवत्ता यादीतील केंद्रनिहाय प्रवेश संख्येनुसार संबंधित विद्यार्थ्यानी विभागीय केंद्रावर आपल्या प्रवेश अर्जाची पडताळणी करून घ्यावी. विभागीय केंद्राने प्रवेशार्थीच्या प्रवेशअर्जातील भरलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर केंद्रनिहाय प्रवेश गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर विद्यापीठ व अभ्यासकेंद्र शुल्क भरून उमेदवाराने आपला प्रवेश नियोजित कालावधीत निश्चित करावा. आपल्या प्रवेशासंदर्भातील माहिती / कागदपत्रे चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठाला

प्राप्त झाल्यास विद्यापीठ समिती मार्फत आपल्या प्रवेशाची चौकशी करण्यात येईल. तक्रारीत तथ्य आढळल्यास आपला प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेश रद्द करताना आपण भरलेले प्रवेश शुल्क परत केले जाणार नाही. तसेच आपल्यावर खोटी माहिती पुरविल्यासंदर्भात FIR दाखल केला जाईल. याची प्रवेशेच्छूनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवारांना आरक्षणाअंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे. अशा उमेदवारांनी शासन निर्णयानुसार आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे तसेच नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र विभागीय केंद्र प्रवेश अर्ज पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.

वाचा   पॅन आधार लिंक|The Risks of Not Linking PAN and Aadhaar Card

७) विभागीय केंद्रावर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर प्रवेशअर्ज आपोआप लॉक होईल. त्यामुळे पडताळणी नंतर कोणत्याही बदलासंदर्भातील पत्रव्यवहार विद्यापीठाला करू नये.

८) प्रवेशार्थीनी आपल्या शाळेच्या जिल्ह्यातूनच प्रवेश अर्ज भरावा अन्यथा प्रवेशप्रक्रियेतून तो बाद होईल. जिल्हानिहाय अभ्यासकेंद्राची यादी असणारा तक्ता या माहितीपुस्तिकेत बी. एड. शिक्षणक्रमाचे अभ्यासकेंद्र या मुद्याअतर्गत देण्यात आलेली आहे. उदा :

मुंबई उपनगर (सबअर्बन) साठी – चेंबूर सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चेंबूर हे केंद्र असेल. यात बोरिवली (URC-1), कांदिवली (URC-2), गोरेगाव (URC-3), अंधेरी (URC-4), सांताक्रूझ (URC-5), भांडूप (URC-6), घाटकोपर (URC-7), चेंबूर (URC-8), कुर्ला ( URC-9), घाटकोपर (DYD_URC3), अंधेरी (DYD_URC5), मालाड W (DYD_URC6), कांदिवली E (DYD_URC7), हे भाग असतील. मुंबई शहरासाठी एस.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालय धोबीतलाव हे अभ्यासकेंद्र असेल. यात परेल (URC-10), दादर (URC-11), भायखळा (URC-12), ग्रँटरोड (DYD_URC1), सायन (DYD_URC2), मुलूड (DYD_URC4) हे भाग असतील.- ठाणे व पालघर या जिल्ह्यासाठी सेवासदन कॉलेज ऑफ एज्युकेशन, उल्हासनगर असेल.रायगड जिल्ह्यासाठी रायगड जिल्ह्यातील शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय असेल.-

९) महाराष्ट्रातील पालघर जिल्हा वगळता प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र अभ्यासकेंद्र आहे. प्रवेशार्थीने आपल्या शाळेच्या जिल्ह्याचाच अभ्यासकेंद्र म्हणून विचार करणे अनिवार्य आहे. पालघर जिल्ह्यातील प्रवेशार्थिनी ठाणे जिल्ह्यातूनच अर्ज भरणे अपेक्षित आहे.

१०) एखाद्या जिल्ह्याच्या जागा प्रवेशअर्जाअभावी रिक्त राहिल्यास त्या विभागातील उर्वरित जिल्ह्यांच्या संबंधित प्रवर्गातील सर्व उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्तेनुसार संबंधित प्रवर्गातील उर्वरित जागा नव्याने तयार केलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या जिल्ह्यातच अतिरिक्त जागा म्हणून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. हे करताना त्या जिल्ह्यातील जागा ५० पेक्षा जास्त होणार नाही. याचा विचार करण्यात येईल.

वाचा   Learn how to check your diploma results at msbte.org.in for the winter 2023 MSBTE exam.

११) दिव्यांगासाठी ५% म्हणजे एकूण ७५ जागा भरण्यात येतील. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला दोन / तीन

जागा दिव्यांग विद्यार्थी प्रवेश कार्यपद्धतीनुसार गुणवत्ता यादीचा विचार करून भरण्यात येतील. ज्या जिल्ह्यात दिव्यांगांचे अर्ज जास्त असतील त्यातील पाच जिल्ह्यांना दिव्यागांच्या तीन जागा देण्यात येतील.

१२) प्रवेशासंदर्भातील सर्व सूचना “http://ycmou.digitaluniversity.ac’ या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येतील. प्रवेशार्थीने त्या पाहून त्यानुसार कृती करणे प्रवेशार्थीची जबाबदारी असेल. १३) प्रवेशांनंतर विद्यापीठाकडून बी.एड. शिक्षणक्रम संरचना, अभ्यासविषयक साहित्य किंवा अभ्यासकेंद्रात कोणत्याही कारणास्तव बदल करण्यात आला तर तो प्रवेशार्थीला बंधनकारक असेल.

| महत्त्वाचे – या शिक्षणक्रमाला दिला जाणारा प्रवेश केवळ गुणवत्तेनुसार व नियमानुसार दिला जातो. अन्य कोणताही मार्ग कोणी सूचित केल्यास मा. कुलसचिव यांच्याकडे लेखी तक्रार करावी.

इतर महत्वाचे पोस्ट

पायाभूत चाचणी उद्देश/ उपयोग / फायदे

नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश 2024

मध्यान भोजन कैलकुलेटर 2023

1जुलै वेतनवाढ

ycmou bed 2023-25 admission started|प्रवेश पात्रतेची अट

१)महाराष्ट्रातील सरकार मान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक

२)मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान 50% गुण व राखीव प्रवर्गासाठी 45% गुण पदव्युतर पदवी.

3)डीएड /दि टी एड / क्राफ्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केलेले .

प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका online विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे. प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000/- व राखीव प्रवर्गासाठी 500/- online भरून अर्ज online सदर करावी.

महत्वाचे लिंक

(ycmou bed 2023-25 admission started)माहिती पुस्तिका डाउनलोड करा

  •  ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
  • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
  • ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  • तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
  • ऑनलाईन प्रवेशअर्ज पूर्ण भरण्यास आपल्याला कधीही काही अडचण अथवा अडथळा आपणास उद्भवल्यास आपण आमच्याशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या घ्यावे

महात्वाचे प्रश्नमंजुषा

जागतिक लोकसंख्या दिवस क्विझ

आंतरराष्ट्रीय योग दिन ( क्वीज)

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा|

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

महामानव डॉ बाबासाहेब अम्बेडकर जयंती

Why do we celebrate National Sports Day on 29th August?

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात