१) www.mscepune.in किंवा www.nmmsmsce.in संकेतस्थळास भेट देणे.
सर्व सूचना व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच शाळा नोंदणी या बटनावर क्लिक करा.
उघडलेल्या ऑनलाईन अर्जात अचूकपणे शाळेची व मुख्याध्यापकाची माहिती भरा आणि माहिती अचूकपणे भरल्यानंतर सबमिट (Submit) बटनावर क्लिक करा.
अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील Login Id व Password द्वारे Login करा.
स्टुडन्ट रेजिस्ट्रेशन (Student Registration) या बटनावर क्लिक करा.
अचूकपणे माहिती भरा आणि नवीनतम फोटो, स्वाक्षरी इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर सेव्ह (Save) बटनावर क्लिक करा.
Preview या बटनावर क्लिक करून आपले भरलेले आवेदनपत्र पाहून अर्जातील माहितीची पडताळणी करा .
आवेदनपत्र काळजीपूर्वक तपासून पाहावे कारण आवेदनपत्र सबमिट झाल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
प्रीव्हयुव (Preview) मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून पुन्हा बदल करू शकता .खात्री झाल्यास प्रोसिड टु पे (Proceed to pay ) या बटणाचा वापर करून ऑनलाईन पध्द्तीने ऑनलाईन बँकिंग ,क्रेडिट /डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्द्तीने शुल्क भरावे लागेल.
विहित मुदतीत आवेदनपत्राची प्रिंट घ्या.