Table of Contents
puppss 2024 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक
परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२३ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक
तपशील | शुल्क प्रकार | कालावधी |
शाळा माहिती प्रपत्र, | नियमित शुल्कासह (With Regular Fee) | ०१ सप्टेंबर २०२३ ते ०७ डिसेंबर २०२३ |
आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे. | विलंब शुल्कासह (With Late Fee) | ०८ डिसेंबर २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ |
अतिविलंब शुल्कासह (With Super Late Fee) | १६ डिसेंबर २०२३ ते २३ डिसेंबर २०२३ | |
अति विशेष विलंब शुल्कासह (With Special Super Late Fee) | २४ डिसेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ ऑफलाईन पध्दतीने |
दि. ३१/१२/२०२३ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी.
1 thought on “puppss 2024 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक”