खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी मानधनामध्ये भरगोस वाढ |Substantial increase in emoluments of non-teaching staff in private aided schools for the first three years from their first appointment.

Spread the love

खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी मानधनामध्ये भरगोस वाढ

Substantial increase in emoluments of non-teaching staff in private aided schools for the first three years from their first appointment.

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहील्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक २५.११.२००५ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले होते:-

पदनाममानधन
कनिष्ठ लिपीक2000/-
अर्धवेळ ग्रंथपाल1500/-
पूर्णवेळ ग्रंथपाल2500/-
अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यक2000/-
पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यक2500/-
चतुर्थश्रेणी कर्मचारी1700/-
खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी मानधनामध्ये भरगोस वाढ

imp notification about maha tait 2023

सदर शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मानधनात २००५ नंतर वाढ करण्यात आलेली नाही. नियमित शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनात झालेली वाढ, वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करुन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे:-

खुशखबर शिक्षण सेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ| Good news: Doubling the salary of shikhshan sevak
Photo by Ravi Roshan on Pexels.com
पदनाममानधन
ग्रंथपाल14000/-
प्रयोगशाळा सहाय्यक12000/-
कनिष्ठ लिपीक10000/-
चतुर्थश्रेणी कर्मचारी (केवळ अनुकंपा तत्वावर नियुक्त)8000/-
खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी मानधनामध्ये भरगोस वाढ

खुशखबर शिक्षण सेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ|

click here for job related post

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक ११.१२.२०२० नुसार चतुर्थश्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद व्यपगत करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थश्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. तथापि, अनुकंपा तत्वावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत असल्याने या प्रकारे चतुर्थश्रेणी पदावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील तक्त्यातील मानधन लागू असेल. तसेच जे चतुर्थश्रेणी कर्मचारी दि.११.१२.२०२० पूर्वी चतुर्थश्रेणी संवर्गात सेवक या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत व ज्यांचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आलेला नाही, त्यांना देखील वरील मानधन अनुज्ञेय राहील.

सदर मानधन दि.०१ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. यासाठी येणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२३०२०७१३१७४१३०२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202302071317413021.pdf
खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहील्या तीन वर्षांसाठी मानधनामध्ये भरगोस वाढ

Leave a comment

गुरु नानक जयंती साजरीकरण: शिकवणी, शुभेच्छा बाबा गुरु नानक यांच्या प्रमुख उपदेश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी अभिवादन संदेश संग्रह National Education Day 2024 : ११ नोव्हेंबर ला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिवस? भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश )