15 msq quiz on World Intellectual Property Day बौद्धिक संपदा दिन – प्रश्नमंजुषा
बौद्धिक संपदा दिन (World Intellectual Property Day) दरवर्षी २६ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये बौद्धिक संपदेचे महत्त्व समजावणे आणि कलाकार, संशोधक, उद्योजक यांचे हक्क व सर्जनशील कार्य सुरक्षित ठेवण्यासाठी जनजागृती करणे.
बौद्धिक संपदा म्हणजे पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, औद्योगिक डिझाईन, व व्यापार रहस्य (trade secrets) यासारखे हक्क, जे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या सर्जनशील कल्पनांवर आधारित असतात.
ही प्रश्नमंजुषा (MCQ) विद्यार्थ्यांना वाचकांना बौद्धिक संपदा हक्कांची मूलभूत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. खालील प्रश्नांमधून आपण बौद्धिक संपदा हक्कांचे विविध प्रकार, उपयोग, संरक्षण कालावधी, तसेच जागतिक संस्था याविषयी समजून घेणार आहोत.