HSC 2021 EXAM निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण
माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी २४ जून २०२१ रोजी निकालानुसार सदर परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाल्यानंतर सदर निकालावर विद्यार्थ्याचे काही अपेक्षा किंवा तक्रारी असतील तर त्यांच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केले आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२ वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना सदर निकालावर काही आक्षेप तक्रारी असतील तर त्या नोंदविण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी मंडळामार्फत संबंधित विभागीय मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय मंडळ मंडळातील विभागीय सचिव हे काम पाहतील सदर तक्रार निवारण अधिकारी तथा विभागीय सचिव यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक ईमेल आयडी खालील प्रमाणे आहेत.
संबंधित विद्यार्थी च्या संदर्भातील तापली तक्रार अर्ज टपाल किंवा ईमेल किंवा व्यक्तिशः उपरोक्त तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे सादर करू शकतील यासाठी मंडळामार्फत विविध करण्यात आलेल्या प्रपत्र नमुन्यात अर्ज विद्यार्थ्यास सादर करावे लागेल.
bridge course 2021 (सेतू अभ्यासक्रम )
सदर अर्ज नमुना खाली दिलेला आहे.
तक्रार निवारण अधिकारी
तक्रार निवारण अधिकारी कार्यालयीन कामाच्या दहा दिवसात सदर अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने परिपूर्ण वस्तुस्थिती पत्र ई-मेलद्वारे अवगत करतील.
अ.क्र. | विभागीय मंडळाचे नाव | विभागीय सहसचिव /सहा.सचिव यांचे नाव व पत्ता | भ्रमण ध्वनी क्रमांक | ईमेल आयडी |
१ | पुणे | श्रीम.प्रिया शिंदे ,सहसचिव पुणे विभागीय मंडळ , पुणे | 9689192899 | sscboardpune@gmail.com |
२ | नागपूर | श्रीम.माधुरी सावरकर सहसचिव नागपूर विभागीय मंडळ , नागपूर | 9403614142 | msboardnagpur@gmail.com |
३ | औरंगाबाद | श्री. राजेंद्र पाटील सहसचिव औरंगाबाद विभागीय मंडळ , औरंगाबाद | 9922900825 | chair.aurboard@mshedu.gov.in |
४ | मुंबई | श्री . मुश्ताक शेख सहसचिव मुंबई विभागीय मंडळ , मुंबई | 7020014714 | sschsc.mumbailboard@gmail.com |
५ | कोल्हापूर | श्री. देविदास कुल्लाळ , सहसचिव कोल्हापूर विभागीय मंडळ , कोल्हापूर | 7588636301 | divsec.kop@gmail.com |
६ | अमरावती | श्रीम. जयश्री राऊत , सहसचिव(प्र) अमरावती विभागीय मंडळ , अमरावती | 9960909347 | divsecamt@rediffmail.com |
७ | नाशिक | श्रीम.एम. यु.देवकर , सहसचिव (प्र) नाशिक विभागीय मंडळ , नाशिक | 8888339423 7755903427 | nsksec@rediffmail.com |
८ | लातूर | श्री.संजय पंचगल्ले, सहसचिव (प्र) लातूर विभागीय मंडळ , लातूर | 9421694282 | divsecretarylatur@gmail.com |
९ | कोकण | श्रीम.भावना राज्नोर , सहसचिव कोकण विभागीय मंडळ , कोकण | 8806512288 | divchairman.konkan@gmail.com |
कोरोना च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थिती विचारात घेऊन सन 2020 21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेले उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षा दिनांक अकरा जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली तर नंतर दिनांक ०२ /०७/२०२१ च्या शासन निर्णयानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना गुणपत्रक प्रमाणपत्र देण्यासाठी सुधारित मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.