nmms 2021 selection list Maharashtra

Spread the love

NMMS २०२१ निवड यादी

nmms 2021 selection list Maharashtra १८ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर करण्यात आले आहे. NMMS 2020-21 इयत्ता आठवी साठी परीक्षा दिनांक ०६ एप्रिल 20२१ शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी. सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ही मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे .


महत्वाचे दुवे

शिक्षक मेगा भरती महाराष्ट्र 2021

MAHA tet 2021 notification

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२०-२१ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२०-२१

NMMS interim answer key 2021 ; download now

namms exam papers

National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2020-21)


nmms 2021 selection list Maharashtra

काय आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा?

आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञा ची जोपासना तसेच त्यांचे १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती च्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.

सदर शिष्यवृत्ती बारावी पर्यंत मिळते सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा १००० आहे म्हणजे वार्षिक १२००० रुपये.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजे NMMS विद्यार्थ्यांना प्राप्‍त गुणांची यादी दिनांक २६-०७-२०२१ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

nmms इयत्ता ८ वी साठी परीक्षेसाठी ९६६८५ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते सदर ची परीक्षा दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आली NMMS परीक्षा साठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा एमएचआरडी नवी दिल्ली यांच्या कडून निश्चित केला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते तसेच संबंधित संवर्गात अपंगासाठी ४ टक्के आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे इयत्ता सातवी व आठवी ची विद्यार्थी संख्या व 12 ते 14 वयोगटातील संख्या यांच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे.

ही निवड यादी व गुण गुण यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/https://nmms.mscescholarshipexam.in/ या संकेतस्थळावर १८ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a comment

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 100 शुभेच्छा संदेश मराठीत दिवाळी सुट्टीच्या शुभेच्छा: विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 100 शुभेच्छा संदेश मराठीत दिवाळी सुट्टीच्या शुभेच्छा: विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी पोलीस स्मृतिदिनानिमित्त 25 विनम्र अभिवादन संदेश संग्रह वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025