Job नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती संपूर्ण देशभरात होत असून पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालयमध्ये देखील विविध पदांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता 8वी आणि 10वी पाससाठी आहे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालयमध्ये नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता MBBS आहे.
Table of Contents
बँक ऑफ इंडिया
पोस्ट – प्रोबेशनरी ऑफिसर (क्रेडिट ऑफिसर, IT ऑफिसर)
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा – 500 (यात क्रेडिट ऑफिसरसाठी 350 आणि IT ऑफिसरसाठी 150 जागा आहेत.)
वयोमर्यादा – 20 ते 29 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट – bankofindia.co.in
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव
पोस्ट – अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता – 8वी, 10वी पास
एकूण जागा – 135
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
वयोमर्यादा – 18 ते 33 वर्ष
लवकरात लवकर अर्ज करा.
अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालय, पुणे
पोस्ट – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS
एकूण जागा – 49
मुलाखतीतून निवड होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे– 411037
मुलाखतीची तारीक – 20 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
वरणगाव ऑर्डिनेंस फॅक्टरी
पोस्ट – पदवीधर प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, B.Sc.
एकूण जागा – 40
नोकरीचं ठिकाण – जळगावातलं वरणगाव
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – द जनरल मॅनेजर, ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा जळगाव – 425308
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट – www.ddpdoo.gov.in
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
इतर महत्वाची बातमी: