national talent search exam info 2021

Spread the love

NTS (national talent search examination ) म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दर वर्षी डिसेम्बर महिन्या मध्ये आवेदन भरण्यास सुरु होते .परिक्ष दोन स्तरावर होते राज्य व केंद्र स्तर . आवेदन भरण्य करिता राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा चे संकेत स्थळ https://nts.mscescholarshipexam.in/ वर जावून भरू शकता .

national talent search exam info 2021

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा चे उद्दिष्ट व महत्त्व

इयत्ता दहावीच्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे यासह यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र याची सेवा करावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहेत

निवड पद्धती

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एनसीईआरटी नवी दिल्ली यांचेमार्फत 2012-13 पासून राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा इयत्ता दहावी साठी दोन स्तरावर घेण्यात येत आहे

वाचा   practice papers for national talent search 2021

अ) राज्यस्तर ब) राष्ट्रीय स्तर

शिष्यवृत्ती

अखिल भारतीय पातळीवर अंदाजित शिष्यवृत्ती संख्या २००० असून यासाठी SC साठी 15% ST साठी ७.५% केंद्रीय सूचीनुसार (नॉन क्रिमिलियर) ओबीसीसाठी 27% आणि ईडब्ल्यूएस (ECONOMICLE WEAKER SECTION) १० % शिष्यवृत्त्या आरक्षित असतील .तसेच संबंधित संवर्गात ४% दिव्यांगासाठी आरक्षण असेल

प्रमाणपत्र

अ) राज्यस्तर परीक्षेतून राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, ब)राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेतून शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट 2019 रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिले जाईल

वाचा   practice papers for national talent search 2021

शिष्यवृत्ती दर

शिष्यवृत्ती धारकांना खालील प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येईल

शालान्त परीक्षेनंतर दोन स्तरावर दोन वर्षे इयत्ता अकरावी व बारावी साठी दरमहा १२५० रुपये,

सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत उदाहरणार्थ बीए बीकॉम बीएस्सी साठी दरमहा २००० रुपये शिष्यवृत्ती असेल

सर्व शाखांच्या द्वितीय पदवी पर्यंत म्हणजे पदवीत्तर पदवी पर्यंत २००० दरमहा शिष्यवृत्ती असेल

पीएचडी साठी चार वर्षापर्यंत म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर शाखांसाठी विद्यापीठ आयोगाचे नियमानुसार मान्य दराने दरमहा शिष्यवृत्ती असेल

अर्हता

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनी राज्यस्तर परीक्षेस बसता येते त्यासाठी वयाची उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही तसेच कोणत्याही पूर्व परीक्षा देण्याची अट नाही

वाचा   practice papers for national talent search 2021

ओपन डिस्टन्स लर्निंग म्हणजे ओ डी एल स्कूल योजनेखाली नोंदविलेले खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतात

  • एक जुलै 2019 रोजी त्यांचे वय 18 पेक्षा कमी आहे
  • जे नोकरी करत नाहीत
  • जे इयत्ता दहावीच्या परीक्षेत ला पहिल्यांदाच बसत आहेत

पात्रता गुण

  • MAT व SAT विषयासाठी प्रत्येक विषयात स्वतंत्रपणे जनरल संवर्गासाठी 40 टक्के गुण व एससी एसटी व दिव्यांगांसाठी 32 % गुण आवश्यक आहेत
  • विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करताना व जागून निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर परीक्षेसाठी केला जात नाही

परीक्षेचे माध्यम

मराठ ,उर्दू ,हिंदी ,गुजराती ,इंग्रजी ,तेलगु ,कन्नड

परीक्षेच्या तयारी करिता सराव प्रश्न पत्रीक डाउनलोड करा

Categories NTS

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात