महाराष्ट्र शासनाचा निर्णय – महागाई भत्ता ५५%, १ जानेवारी २०२५ पासून लागू| तुमचा पगार किती वाढला? जाणून घ्या
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देत महाराष्ट्र शासनाने महागाई भत्ता (DA) ५३% वरून ५५% करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे.
वित्त विभागाने ११ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, हा भत्ता सातवा वेतन आयोग प्रमाणे वेतन संरचनेनुसार लागू होईल. १ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील थकबाकी रक्कम ऑगस्ट २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येईल.
महागाई भत्ता देण्याबाबतच्या विद्यमान नियम व पद्धती पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. संबंधित खर्च विभागाच्या वेतन व भत्ते या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविला जाईल. यात अनुदानित संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. NPS कॅल्क्युलेटर, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना
सदर शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध असून, संदर्भ क्रमांक 202508111122037305 असा आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून, उत्सव काळापूर्वी खरेदी शक्ती वाढण्यास मदत होणार आहे.
तुमचा नवीन पगार जाणून घ्या – DA कॅल्क्युलेटर
खालील बटणावर क्लिक करून ५५% महागाई भत्त्यानंतरचा तुमचा पगार जाणून घ्या.
महागाई भत्ता वाढ – ५३% वरून ५५% : S-13 वेतनश्रेणीतील उदाहरणासह तुलना
१ जानेवारी २०२५ पासून महाराष्ट्र शासनाने महागाई भत्ता (DA) ५३% वरून ५५% केला आहे.
यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. चला, S-13 वेतनश्रेणीतील (राज्य शासन कर्मचारी) उदाहरण घेऊन तुलना पाहूया.
S-13 वेतनश्रेणी – मूलभूत पगाराचे उदाहरण
(७ वा वेतन आयोगानुसार, S-13 स्तराचा मूलभूत पगार ₹४४,९०० धरला आहे.)
महागाई भत्ता ५३% असताना
- मूलभूत पगार: ₹44,900
- DA (53%): ₹23,797
- एकूण (मूळ पगार + DA): ₹68,697
महागाई भत्ता ५५% झाल्यावर
- मूलभूत पगार: ₹44,900
- DA (55%): ₹24,695
- एकूण (मूळ पगार + DA): ₹69,595
तुलना तक्ता
घटक | ५३% DA (जुना दर) | ५५% DA (नवा दर) | फरक ₹ मध्ये |
---|---|---|---|
मूलभूत पगार | ₹44,900 | ₹44,900 | ₹0 |
महागाई भत्ता (DA) | ₹23,797 | ₹24,695 | ₹898 |
एकूण रक्कम | ₹68,697 | ₹69,595 | ₹898 |
मुख्य मुद्दे
- प्रति महिना वाढ: ₹898
- वार्षिक वाढ: ₹10,776 (कर व कपातीपूर्वी)
- जानेवारी ते जुलै २०२५ थकबाकी: ₹6,286 (७ महिन्यांची वाढ एकत्र)
- ही थकबाकी ऑगस्ट २०२५ च्या वेतनासोबत मिळेल.
तुमचा पगार किती वाढेल? – DA कॅल्क्युलेटर
५५% DA लागू झाल्यावर तुमचा पगार किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा:
माहे ऑगस्ट २०२५ | ५५% महागाई भत्ता वाढीनुसार नवीन वेतन गणना
imp post
Marks Percentage Calculator
zakat calculator|जकात कॅल्क्युलेटर: इस्लामी शरियतानुसार जकातचे मार्गदर्शन
8th pay commission salary calculator
एसबीआय होम लोन कॅल्क्युलेटर – आपल्या EMI ची अचूक गणना करा