international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi

Spread the love

आई पत्नी बहिणीसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश आणि बॅनर

international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi

महिला दिन हा जगभरातील महिलांचे सार साजरे करतो. हा दिवस महिलांना कोणताही पक्षपात किंवा पूर्वग्रह न ठेवता समानतेने का वागवावे याचे महत्त्व दर्शवतो. march 8 रोजी, महिला दिन हा जगातील सर्व वयोगटातील आणि वंशातील महिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो जेथे त्या मुक्तपणे आणि त्यांच्या स्वतःच्या अटींनुसार जगू शकतात.

स्त्रियांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या शक्तीने दडपले गेले आहे ज्याने त्यांच्या निवडी आणि स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या आहेत. परंतु जसजसा काळ पुढे सरकत आहे, तसतसे स्त्रिया त्यांच्या पूर्ण क्षमतेने वाढतात आणि त्यांच्याकडे बोलण्याचे साधन, निवड आणि स्वातंत्र्य आहे याची खात्री करण्यासाठी पावले उचलत आहेत आणि त्यांना हवे ते करू शकतात.

या महत्वाच्या दिन आपल्या घरातील महिला त्या आपल्या आई असो पत्नी असो बहिण असो सर्वाना त्यांचे महत्व तुमच्या जीवनामध्ये किती आहे ते पटवून देण्याचे सर्वोत्तम मार्ग त्यांना शुभेच्छा देणे आहे. या करिता आम्ही आपल्या करिता काही मोजक्या शुभेच्छा संदेश घेवून आलेलो आहे.

आपल्या भावना सोशल मिडिया द्वारे सहज रित्या पाठवण्य करिता प्रत्येक शुभेच्छा संदेश खाली सोशल; मिडिया माध्यम दिले आहे ज्या द्वारे तुम्ही सहज रित्या संदेश पाठवी शकता.

आईला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

कौसल्येविण राम न झाला, देवकीपोटी कृष्ण जन्मला

शिवराजाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे, स्वरूप माऊली पुण्याईचे

थोर पुरुष तो ठरून तियेचा होई उतराई

– ग. दि. माडगूळकर

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi
international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi

ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा (Happy Women’s Day In Marathi).

प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे म्हणून  आज मी सर्व काही आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आई

ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आई तुझ्या मायेला पार नाही तू जे जे कसतेच त्याचा कधीच अंतपार नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आई असतो एक धागा

वातीला उजेड दावणारी समईतली जागा,

घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान

विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

– फ. मु. शिंदे

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला

देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला,

पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला

तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला

– बहिणाबाई चौधरी

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi
international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi

दिला जन्म तू विश्व हे दाविलेस

किती कष्ट माये सुखे साहिलेस,

जिण्यालागी आकार माझ्या दिलास,

तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!

– ग. दि. माडगूळकर

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे. माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा मी भरून पावतो.

मला जन्म देणाऱ्या आणि या सृष्टीला जन्म देणाऱ्या अनंत मातांना माझा शाष्टांग नमस्कार… जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा 

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

माझ्यावर तुझे प्रेम अनंत, तुझ्या प्रेमाला नाही सीमा, तुझ्या कतृत्व आणि मातृत्वाला कुठलीच नाही सीमा. आई महिला दिनाच्या शुभेच्छा 

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी 10 प्रेरणादायी महिला

वाचा   chocolate day quotes चॉकलेट डे कोट्स:

Celebrating Women: Inspiring International Women’s Day Quotes and Posters

Honoring Women’s Contributions: An International Women’s Day Speech

आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात

मेतकूट कालवलेला मऊ तूपभात,

आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र

सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र,

– शांताबाई शेळके

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायकोसाठी

प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की ती क्षणात कौतूकातून प्रेमात आणि प्रेमातून सुखी वैवाहिक जीवनाचा प्रवास करू शकते.

ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi
international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

ज्याच्यासोबत तुझ्यासारखी निर्मळ पत्नी आहे त्याला कशाची काय भ्रांत…तू माझ्या आयुष्यात आहेस ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

तुझ्या किर्तीची पताका दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो…जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा

जबाबदारीसह घेते भरारी, न थके ना तक्रार करी.महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सुखदुःखात साथ देतेस, थकत नाहीस कधीच, आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा, साथ सोडू नको कधीच महिला दिनाच्या शुभेच्छा

यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते,
हे तुझ्याकडे पाहून मला समजले.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.

पत्नी घराचा स्वर्ग अथवा नर्क दोन्ही करू शकते. तू मात्र माझ्या घराचं नंदनवन केलंस याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi
international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi

जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

तुझ्या कतृत्त्वाचा डोंगर पाहून इतरांना हेवा वाटतो तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून येते. तू अशीच यशस्वी हो. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

बहिणीला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

नानाविध भूमिकांमधून आयुष्याच्या

प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर

सोबत करणाऱ्या “ती”ला

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्री म्हणजे एक खडतर वाट….

अश्यक्य ते शक्य करून दाखविणारी

अन्यायाला न्याय मिळवून देणारी

जी बदलेल समाजाची वहिवाट..

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi
international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi

आदिशक्ती तू ,प्रभूची भक्ती तू

झाशीची राणी तू ,मावळ्यांची भवानी तू

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू

आजच्या युगाची प्रगती तू

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

ज्याला स्त्री ‘बहिण’ म्हणून कळली तो

मुक्ताईचा ‘ज्ञानोबा’ झाला….

ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो

राधेचा ‘शाम’ झाला….

ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो

सितेचा ‘राम’ झाला….

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

अन्नपूर्णा तू ,गृहलक्ष्मी हि तू

आणि तुच आहेस दुर्गा माता

रोमारोमात तुझ्या भरलीये

ममता आणि कणखरता

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख पाहता आत्तापर्यंत

प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे! 

अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !

#जागतिक_महिला_दिन निमित्त समस्त महिला भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!

शांत राहणे हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे !

वरूनी जरी पाणी असले तरी ती आतून आग आहे !!

वागणे तिचे एकदम कडक अन सक्त आहे !

कारण तिच्या अंगात मॉ जिजाऊच रक्त आहे !!

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जन्मा येण्या कारण तू

नात्यांमधली गुंफण तू

दुःखाला लिंपण तू

मायेचं शिंपण तू

झिजतानाही दरवळणारं

देव्हाऱ्यातलं चंदन तू

स्वार्थाने या जगाला

मिळालेलं वरदान तू..

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi
international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

विधात्याची निर्मिती तू,

प्रयत्नांची पराकाष्ठा तू, 

एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर 

आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,

माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस 

महिला दिनाच्या शुभेच्छा…

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,

स्त्री म्हणजे जीवनभराची साथ 

हे स्त्री तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

नारी ही शक्ती नराची,

नारीच हीच शोभा घराची,

तिला द्या आदर, प्रेम, माया

घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

मला जन्म देणाऱ्या आणि या सृष्टीला जन्म देणाऱ्या 

अनंत मातांना माझा साष्टांग नमस्कार… 

जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा 

ती भीत नाही म्हणून ती खंबीर नाही

तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

स्री म्हणजे वास्तव्य,

स्री म्हणजे मांगल्य,

स्री म्हणजे मातृत्व,

स्री म्हणजे कतृत्व,

जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

ती आई आहे, 

ती ताई आहे, 

ती मैत्रिण आहे, 

ती पत्नी आहे, 

ती मुलगी आहे, 

ती जन्म आहे, 

ती माया आहे, 

ती सुरूवात आहे 

आणि तिच नसेल तर 

सारं काही व्यर्थ आहे. 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

विधात्याने घडवली सृजनांची सावली, 

निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी. 

महिला दिनाच्या शुभेच्छा…

international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi
international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi

ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक 

तर कधी धगधगती ज्वाळा, 

म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो 

चंदेरीसोनेरी उजाळा…

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, 

तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता….

महिला दिनाच्या शुभेच्छा….

9 thoughts on “international womens day wishing messages and banners for mother wife sister in marathi”

Leave a Reply

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष

%d bloggers like this: