महिलांच्या अनुदानात 20 लाखांवरून 1 कोटी रुपये; महिला उद्योजक धोरण योजना|From Rs 20 lakh to Rs 1 crore in women’s subsidies; Mahila Loan Yojana

Spread the love

महिलांच्या अनुदानात 20 लाखांवरून 1 कोटी रुपये; महिला उद्योजक धोरण योजना|From Rs 20 lakh to Rs 1 crore in women’s subsidies; Mahila Loan Yojana

Loan Scheme :सर्व उद्योगांमध्ये महिलांना प्रमुख पदे मिळतील याची हमी देण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. महिला उद्योजक धोरण योजना ही राज्य सरकारच्या पुढाकारांपैकी एक आहे ज्याचा उद्देश महिला व्यवसायांना चालना देण्यासाठी आहे.

महिला उद्योजक धोरण (Mahila Loan Yojana)

महिला उद्योजक धोरण योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या विशेष धोरणांतर्गत राबविली जात असून महिलांना या अंतर्गत विविध उद्योगासाठी 20 लाखापासून 1 कोटीपर्यंत अनुदान दिलं जातं.

हे ही वाचा

सौर रूफटॉप योजना 2023 चे लाभ घ्या: छतावर फक्त 500 रुपयांमध्ये सौर पॅनेल बसावा

पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी लाभार्थी स्थिती पाहण्या करिता स्टेप्स

पीएम किसानच्या 14व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट, जाणून घ्या पैसे कधी येतील

पंतप्रधान उज्ज्वला योजना: वाढत्या जागतिक किमतींदरम्यान सरकारने एलपीजी सिलिंडर सबसिडी वाढवली

महिलांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी देण्यासाठी सरकारने महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण मंजूर केले आहे. महिला उद्योजक धोरणासाठी राज्यातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत आणि अनेक महिला या कार्यक्रमाचा उपयोग करत आहेत.

हा लेख महिला व्यवसाय मालकांना नियंत्रित करणार्‍या नियमांबद्दल माहिती देईल. महिला उद्योजकांवरील धोरण काय फायदे देते? क्षेत्राला किती सहाय्य दिले जाईल? मी अर्ज कसा करू शकतो? त्याबद्दल काही तपशील.

20 लाखापासून 1 कोटीपर्यंत अनुदान

20 लाखापासून 1 कोटीपर्यंत अनुदान या धोरणांतर्गत ग्राह्य धरण्यात आलेले असले तरी जिल्ह्याच्या वर्गवारीनुसार महिला उद्योजकांना अनुदान दिलं जातं. त्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या वर्गवारीमध्ये मोडतो हे प्रथम जाणून घ्यावे लागेल.

♦️ हे पण वाचा : मुलींना शासन आता वार्षिक 99 हजार रु. देणार; शासनाची नवीन योजना

महिला उद्योजक धोरणात महिलांना प्रकल्प भांडवलाच्या गुंतवणुकीच्या 25 ते 35 टक्के अनुदान शासनाकडून दिल जातं, तर उर्वरित प्रकल्पाची रक्कम बँकेकडून कर्ज (Loan) घेऊन अथवा स्वनिधीमार्फत महिलांना उभारावी लागते.

अटी, शर्ती व पात्रता ?

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  • योजनेचा लाभ वैयक्तिक महिला, भागीदारी, सहकारी क्षेत्र, खाजगी किंवा सार्वजनिक घटक, स्वयंसहायता बचत गट इत्यादी घेऊ शकता.
  • व्यवसाय सुरू केल्यानंतर कामाच्या ठिकाणी किमान 50 टक्के महिला कामगार असणे आवश्यक आहे.
  • महिला उद्योजकांना तालुका वर्गवारीनुसार स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 15 ते 35 टक्के दराने अनुदान देण्यात येईल.
  • त्याचप्रमाणे उद्योगांना लाईट बिलसाठीसुद्धा सवलत देण्यात येईल, ज्यामध्ये प्रति युनिट 2 रुपये एवढी सवलत पाच वर्षासाठी असेल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्र

  1. आधारकार्ड
  2. बँक पासबुक झेरॉक्स
  3. जातीचा दाखला
  4. शैक्षणिक कागदपत्रं
  5. पॅनकार्ड
  6. व्यवसाय प्रोजेक्ट रिपोर्ट
  7. जन्म दाखला
  8. पासपोर्ट आकाराचा फोटो
  9. Undertaking फॉर्म
  10. लोकसंख्या प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम इच्छुक उद्योजक महिलांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटची लिंक खाली देण्यात आलेली आहे.
  • वेबसाईटवर आल्यानंतर अर्जदार उद्योजक महिलांची संपूर्ण मूलभूत माहिती भरावी लागेल. ज्यामध्ये संपूर्ण नाव, जात प्रवर्ग, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती, रहिवासी माहिती इत्यादीचा समावेश असेल.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर महिलांना कोणता व्यवसाय करायचा असेल त्या व्यवसायाची Project Cost अर्जामध्ये टाकावी लागेल, त्यानंतर बँकेची माहिती भरून Undertaking Form व Project Report फाईल डाऊनलोड करावी लागेल.
  • शेवटच्या टप्प्यामध्ये अर्जासाठी आवश्यक संपूर्ण कागदपत्र महिला अर्जदारांना स्कॅन करून अपलोड करावी लागतील.

अशाप्रकारे महिला उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष धोरणाअंतर्गत उद्योजक महिला अर्ज करून व्यवसाय करण्यासाठी 20 लाखापासून 01 कोटीपर्यंतचा अनुदान मिळवू शकतात. प्रकल्पाला प्रस्ताव मंजुरी जिल्हा उद्योजक केंद्र व इतर शासकीय कार्यालयाकडून पात्रता, निकषानुसार देण्यात येईल.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
विविध योजनासाठीयेथे क्लिक करा

read this

50 good night sandesh marathi madhye

100 good morning sandesh for sharing in marathi

motivational quotes in marathi

 अभिनंदन शुभेच्छा संदेश

प्रेरणादायी विचार

रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges

25 happy birthday wish to boss/saheb in marathi

आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर

Business Loan for ladies from government,फक्त महिलांसाठी योजना,महिला गृह उद्योग योजना महाराष्ट्र,Prime Minister loan scheme for ladies,small business loans for women.gov india,Government Loan for ladies for business,

2 thoughts on “महिलांच्या अनुदानात 20 लाखांवरून 1 कोटी रुपये; महिला उद्योजक धोरण योजना|From Rs 20 lakh to Rs 1 crore in women’s subsidies; Mahila Loan Yojana”

Leave a Reply

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह