इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025 – संपूर्ण मार्गदर्शक
प्रवेश प्रक्रियेची सुरुवात
महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 11वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- इयत्ता 10वीचे गुणपत्रक
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (लागल्यास)
- नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागल्यास)
- EWS प्रमाणपत्र (लागल्यास)
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागल्यास)
- प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (लागल्यास)
- माजी सैनिकांच्या मुलांसाठी प्रमाणपत्र (लागल्यास)
प्रवेश प्रक्रियेचे टप्पे
- नोंदणी प्रक्रिया: अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन नोंदणी करा.
- अर्ज भरणे: वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
- प्राधान्यक्रम निवड: इच्छित महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम निवडा.
- कागदपत्रे अपलोड: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज सबमिट: सर्व माहिती तपासून अर्ज अंतिम सबमिट करा.
महत्त्वाच्या तारखा (संभाव्य)
- नोंदणीची सुरुवात: 26 मे 2025
- नोंदणीची अंतिम तारीख: – 3 june 2025
- अस्थायी गुणवत्ता यादी जाहीर: – 5 june 2025
- शेवटची गुणवत्ता यादी जाहीर: – जून 2025
- कॉलेज वाटप: — जून 2025
- प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: – जून 2025
प्रवेशासाठी महत्त्वाच्या सूचना
- विद्यार्थ्यांनी एकाचवेळी एकाच अर्जाद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करावी.
- अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड करावीत.
- प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्पे वेळेत पूर्ण करावेत.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या: mahafyjcadmissions.in