mscepune वरून -maha tait 2022 मधील नमुना पेपर आणि महत्वाची माहिती| sample paper and important info from -maha tait 2022 from mscepune

Spread the love

sample paper and important info from -maha tait 2022 from mscepune

maha tait परीक्षा २२ फेब्रुवारी २०२३ ते ०३ मार्च पर्यंत होणे अपेक्षित आहे. परीक्षेला जाताना काही सूचना परीक्षा परिषदेने केले आहे त्याचे वाचन जरूर करा.

खाली दर्शविल्याप्रमाणे ऑन-लाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील.

विभाग प्रश्न संख्या कमाल गुण
अभ्योग्यता १२० प्रश्न १२०
बुद्धिमता ८० प्रश्न ८०
एकूण २०० २००
कालावधी १२० मिनिट

maha tait परीक्षार्थींसाठी महत्वाची सूचना | Important notice for maha tait examinees, don’t neglect

कृपया लक्षात घ्या: परीक्षेचे स्वरूप सर्वग्राही ( Omnibus) असेल. प्रश्नपत्रिकेत कोणतेही विभाग / उपविभाग असणार नाहीत.

परीक्षेसाठी 120 मिनिटांचा अवधी आहे. तरीसुद्धा उमेदवारास परीक्षास्थानी साधारणतः 180 मिनिटे थांबावे लागेल ज्यामध्ये नोंद होणे (logging in), प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे इ. साठी लागणा-या कालावधीचासुद्धा समावेश आहे. भाषिक क्षमता (इंग्रजी) आणि भाषिक क्षमता (मराठी) व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या, उमेदवाराने अर्ज भरतेवेळी निवडलेल्या द्विभाषी माध्यमात (मराठी- इंग्रजी किंवा उर्दू- इंग्रजी भाषेत) उपलब्ध असतील.

दिलेल्या 120 मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणताही प्रश्न सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या चार उत्तरांपैकी, फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य / अचूक पर्यायावर ‘माउस क्लिक’ करावयाचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. उमेद्वाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही. तथापि उमेद्वारांना सल्ला दिला जातो की त्यांनी अंदाज लावून उत्तर देणे टाळावे.

वाचा   educational calendar for December 2020 to April 2021 class one to ten; download now

कृपया लक्षात घ्या की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारांचे अधिक काठीण्य पातळीचे प्रश्न आढळतील, शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील. काही नमुना प्रश्न खाली दिले आहेत.

नमुना प्रश्न

ऑन-लाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील :

(1) परीक्षा ऑन-लाईन म्हणजेच संगणकावर घेतली जाईल.

(2) भाषिक क्षमता (इंग्रजी) आणि भाषिक क्षमता (मराठी) व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या, परीक्षार्थ्याने ऑन-लाईन अर्ज भरतेवेळी निवडलेल्या द्विभाषी माध्यमात (मराठी- इंग्रजी / उर्दू- इंग्रजी) उपलब्ध असतील.

(3)सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या चार उत्तरांपैकी केवळ एकच अचूक उत्तर असेल. परीक्षार्थ्याला अचूक उत्तराची निवड करावयाची असून जो पर्याय उचित/अचूक वाटतोय त्या पर्यायावर ‘माउस क्लिक’ करावयाचे आहे. ‘क्लिक’ केला गेलेला पर्याय ठळकपणे

४)दर्शविला जाईल आणि त्यास प्रश्नाचे उत्तर म्हणून समजले जाईल. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरास अंतिम मुल्यांकनासाठी तेव्हाच विचारात घेतले जाईल जेव्हा उमेदवाराने ‘Save & Next’ वर किंवा ‘Mark for Review & Next वर क्लिक करुन उत्तर दिले असेल.

वाचा   ideal resume with sample format

५) सर्वर मध्ये घडय़ाळ लावलेले आहे आणि तुमच्या संगणकाच्या पटलाच्या वरच्या उजव्या कोप-यातील ऊर्वरीत वेळ दर्शविणारा टाईमर परीक्षा पूर्ण करण्यासाठी शिल्लक राहिलेली वेळ दर्शवेल. जेव्हा घडय़ाळाची वेळ संपेल तेव्हा परीक्षा आपोआप बंद होईल. तुम्हाला स्वतःहून परीक्षा संपवण्याची किंवा थांबवण्याची आवश्यकता नाही.

स्क्रीनच्या उजव्या बाजूला Question पॅलेट दाखवले जाणार असून ते खालील पैकी एक चिन्ह वापरुन प्रत्येक प्रश्नाची स्थिती दाखवेल :

‘पडताळणीसाठी खूण केल्याची’ स्थिती निव्वळ ह्याचे स्मरण देते की तुम्ही हा प्रश्न पुन्हा पाहण्याचे ठरवले आहे. जर ‘पडताळणीसाठी खूण केलेल्या’ प्रश्नाचे उत्तर दर्शविलेले असेल तर अंतिम मुल्यांकनामध्ये ते उत्तर गृहित धरले जाईल.

६)उत्तर दर्शवण्यासाठी प्रश्न निवडायचा असल्यास आपण खालीलपैकी एक करू शकता :

  • (a) थेट त्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी पटलाच्या उजवीकडील प्रश्नतालिकेमध्ये त्या क्रमांकाच्या प्रश्नावर क्लिक करा. कृपया लक्षात राहू द्या की हा पर्याय निवडल्यास तुमचे चालू प्रश्नाला दर्शविलेले उत्तर सुरक्षित केले जात नाही.
  • (b) चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी ‘Save and Next’ वर क्लिक करा आणि क्रमाने पुढच्या प्रश्नाकडे जा.
  • (c) चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी व पडताळणी साठी खूण करण्यासाठी ‘Mark for Review and Next’ वर क्लिक करा क्रमाने पुढच्या प्रश्नाकडे जा.

७) तुमचे उत्तर निवडण्यासाठी दिलेल्या पर्याय बटनांपैकी एका पर्याय बटनावर क्लिक करा.

8) तुमचे उत्तर बदलण्यासाठी दुस-या अपेक्षित पर्याय बटनावर क्लिक करा.

वाचा   डी.एड. कॉलेज बंद? बीएड अभ्यासक्रम आता चार वर्षांचा|Will the D.Ed. colleges close? The BEd course will now last a period of four years, in accordance with educational strategy

9) तुमचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला ‘Save and Next’ वर क्लिक करावेच लागेल.

(10) निवडलेले उत्तर वगळण्यासाठी त्या निवडलेल्या पर्यायावर पुन्हा क्लिक करा किवा ‘Clear Response’ बटनावर क्लिक करा.

(11) एखाद्या प्रश्नावर पडताळणीसाठी खूण करावयाची असल्यास ‘Mark for Review & Next वर क्लिक करा. जर ‘पडताळणीसाठी खूण केलेल्या’ प्रश्नाचे उत्तर दर्शविलेले असेल तर ते उत्तर अंतिम मूल्यांकनामध्ये ग्राह्य धरले जाईल.”

( 12 ) एखाद्या प्रश्नाचे उत्तर बदलण्यासाठी प्रथम प्रश्न निवडा, त्यानंतर नवीन उत्तर पर्यायावर क्लिक करा आणि नंतर ‘Save and Next बटनावर क्लिक करा.

(13) सुरक्षित केलेले प्रश्न किवा उत्तर दर्शवल्यानंतर पडताळणीसाठी खूण केलेले प्रश्नच केवळ मुल्यांकनासाठी विचारात घेतले जातील.

(14) परीक्षार्थ्यांना ‘परीक्षा प्रशासकाच्या’ सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्याची विनंती आहे. जर एखादा परीक्षार्थी सूचनांचे / नियमांचे पालन करीत नसेल, तर तो गैरवर्तणुकीचा/अप्रामाणिक मार्गाच्या अंगिकाराचा प्रकार समजला जाईल आणि असा परीक्षार्थी MSCE ने ठरविलेल्या कालावधीसाठी परीक्षांना बसण्यास अपात्र ठरला जाईल.

(15) केवळ परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी परीक्षार्थी परीक्षा प्रशासकांना त्यांच्या शंका किंवा प्रश्न विचारू शकतात. परीक्षा प्रारंभ झाल्यानंतर कोणत्याही शंकेचे समाधान केले जाणार नाही.

(16) 120 मिनिटे संपल्यानंतर परीक्षार्थ्यांना एकही प्रश्न सोडवता येणार नाही किंवा त्यांच्या उत्तरांची पडताळणी करता येणार नाही. जरी परीक्षार्थीने ‘submit’ बटन क्लिक केले नसले तरीही त्याच्या/तिच्या उत्तरांना संगणक प्रणाली आपोआप सुरक्षित (save) करेल.

१७) कृपया लक्ष्यात घ्या …

१)प्रत्यक्ष परीक्षेची वेळ संपल्या शिवाय परीक्षार्थ्याना पेपर “अंतिमतः सबमिट ” finally submit करू दिले जाणार नाही.

२)एकदा परीक्षा प्रारंभ झाली की कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थ्याने कि बोर्ड ची कोणतीही कि क्लिक करू नये. कारण त्या मुळे परीक्षाच बंद होईल .

Leave a Reply

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
%d