maha tait परीक्षार्थींसाठी महत्वाची सूचना | Important notice for maha tait examinees, don’t neglect

Spread the love

maha tait परीक्षार्थींसाठी महत्वाची सूचना | Important notice for maha tait examinees, don’t neglect

maha tait परीक्षा २२ फेब्रुवारी २०२३ ते ०३ मार्च पर्यंत होणे अपेक्षित आहे. परीक्षेला जाताना काही सूचना परीक्षा परिषदेने केले आहे त्याचे वाचन जरूर करा.

महत्वाच्या च्या सूचना (maha tait २०२२ )

 1. कृपया प्रवेशपत्रावर दर्शविलेले दिनांक, रिपोर्टिंग वेळ आणि परीक्षास्थळाचा पत्ता याची नीट दखल घ्या.
 2. तुम्ही ऑनलाईन परीक्षेच्या केंद्राची निश्चिती करण्यासाठी एक दिवस अगोदर परीक्षा केंद्र पाहून यावे, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुम्ही तिथे वेळेवर (प्रवेश पत्रावर छापलेल्या) पोहोचू शकाल. उशीरा येणा-यांना प्रवेश दिला जाणार नाही.
 3. तुमचा नवीनतम फोटोग्राफ चिकटवलेले प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षा स्थानी आणावयाचे आहे. (शक्यतो तोच फोटो जो तुम्ही अपलोड केला) परीक्षाकेंद्रावर तुम्हाला परीक्षा प्रशासक आणि MSCE चे प्रतिनिधि यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. सूचनांचे उल्लंघन केले गेल्यास तुम्हाला अपात्र गणले जाईल आणि परीक्षाकेंद्र सोडून जाण्यास सांगितले जाईल.
 4. गणकयंत्र (स्वतंत्र किंवा घडयाळासह), पुस्तके, वह्या किंवा लिखित कागद, सेलफोन (कॅमेरा सुविधेसह /शिवाय) किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक यंत्र (उपकरण) यांचा वापर परीक्षेच्या कालावधीत करू दिला जाणार नाही.
 5. कृपया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिकटवलेले प्रवेशपत्र आणि सध्या वैध, मूळ स्वरुपातील फोटो ओळख पत्र (जसे की, पॅन कार्ड/पारपत्र / वाहन चालक परवाना/फोटोसहित मतदार ओळख पत्र / गॅझेटेड अधिका-याच्या किंवा लोकप्रतिनिधिच्या सहीचे अस्सल लेटरहेडवरील फोटो ओळख पत्र/मान्यता प्राप्त महाविद्यालयाने / विश्वविद्यालयाने दिलेले ओळख पत्र (चालू वर्षासाठी स्विकारण्यायोग्य)/फोटोसहित आधारकार्ड/कर्मचारी ओळख पत्र) आणावे. आवेदन पत्रावर असणारे नाव (ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जे उमेदवाराने दिलेले असते) फोटो- ओळख पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळावयास हवे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले / मधले / अंतिम नाव बदलले आहे त्यांनी ह्याची खास दखल घ्यावी. जर आवेदन पत्रावरील आणि फोटो परिचय पत्रावरील नावात काहीही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. कृपया लक्षात घ्या रेशन कार्ड आणि वाहनचालक शिकाऊ परवाना या परिक्षेसाठी वैध ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल, अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना /विवाह प्रमाणपत्र / शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परिक्षेस बसण्यास अनुमती देण्यात येईल.
 6. बायोमेट्रिक डाटा (अंगठय़ाचा ठसा) आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटा च्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय (जुळतो अथवा जुळत नाही) MSCE चा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमैट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास/सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या :
 • (क) जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि परिक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.
 • (ख) जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Finger prints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या.
 • (ग) दोन्ही हातांची बोट सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पूसा.
 • (घ) ठसा घेतल्या जाणा-या अंगठय़ाला जर जखम/मार लागला असेल तर त्वरित परिक्षा केंद्रावर संबंधित अधिका-यास कळवा. (या मुद्द्यांचे पालन करण्यास उमेदवार असमर्थ ठरल्यास परिक्षेस बसु दिले जाणार नाही.)
 1. तुम्ही दिलेल्या उत्तरांचे इतर परीक्षार्थ्यांच्या उत्तरांबरोबर उत्तरांच्या सारखेपणासाठी विश्लेषण केले जाईल. यासाठी अवलंब केलेल्या विश्लेषण प्रक्रियेतून जर उत्तरांची अदलाबदल केल्याचा व तुम्ही प्राप्त केलेले गुण वैध नसल्याचा निष्कर्ष आल्यास तुमची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. कोणीही परीक्षार्थी जर कॉपी करताना, सहाय्य घेताना किंवा देताना, किंवा परीक्षार्थ्यास न शोभणारी गैरवर्तणूक करताना आढळला तर त्याच्या उत्तरांची तपासणी केली जाणार नाही. MSCE अशा परीक्षार्थी विरूद्ध योग्य ती कारवाई करेल.
 2. तुम्ही स्वतः सोबत एक बॉलपॉईंट पेन आणावे. तुम्ही स्वतःचे व्यक्तिगत इंक स्टॅम्प पॅड (निळा / काळा ) सोबत आणू शकता. एक क तुम्हाला दिला जाईल ज्यावर तुम्ही कच्चे काम करू शकता किंवा उत्तर निवडण्यापूर्वी पुन्हा एकदा पडताळणी करावयाच्या प्रश्नांचे क्रमांक लिहू शकता. परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद प्रवेश पत्रासह पर्यवेक्षकाकडे जमा करावे.
 3. परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णतः नाकारण्यात येणार नाही; ज्याचा परिणाम चाचणी वितरणावर आणि / किंवा निकाल तयार करण्यावर होऊ शकतो. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेहून दुस-या जागेत हलविणे किंवा परीक्षेस विलंब होणे गृहित आहे. पुन्हा परीक्षा घेणे या बाबतचा निर्णय हा परीक्षा घेणा-या संस्थेचा /मंडळाचा निर्णय अंतिम असेल. उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करु शकणार नाही. ह्या विलंब झालेल्या प्रक्रीयेस उमेदवार जर हलण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधून संपूर्णपणे वगळण्यात येईल.
 4. जर परीक्षा एकाहून अधिक सत्रात घेतली गेली, तर वेगवेगळ्या सत्रात वापरलेल्या प्रश्नमालिकांच्या काठिण्यपातळीतील किंचित फरकांशी जुळवून घेण्यासाठी विविध सत्रातील प्राप्तांकांना ‘इक्वेट’ केले जाईल. जर नोड क्षमता कमी असेल किंवा एखाद्या केंद्रावर किंवा कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत काही तांत्रिक बिघाड घडला तर एकाहून अधिक सत्रांची आवश्यकता निर्माण होते.
 5. अपंग व्यक्तिंनी (PWD) त्यांच्या व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परिक्षेच्या 30 मिनिटे आधी चाचणी केंद्र प्रशासकांशी संपर्क साधावा.
 6. कृपया नोंद घ्या, एक परिक्षार्थी केवळ एकदाच परिक्षा देऊ शकतो. एका पेक्षा अधिक वेळा परिक्षा दिल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. जर परिक्षार्थीस एका पेक्षा अधिक प्रवेशपत्रे प्राप्त झाले असतील तर तुम्ही प्रवेश पत्रावर दिलेल्या दिनांक आणि वेळेनुसार केवळ एकदाच परीक्षा देऊ शकता.
 7. परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती, संपूर्ण किंवा भागांमधे उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हाः निर्माण करणे,ट्रासमिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण आणि जमा करणारे किंवा परिक्षाकेंद्रामधे दिला जाणारा कागद घेऊन जाणारे, किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
 8. भरतीच्या प्रक्रियेतील कोणत्याही वेळी, परिक्षार्थी द्वारा खोटी माहिती देणे/किंवा प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन करण्याबाबतीत, परिक्षार्थीस भरती प्रक्रियेमधे अपात्र घोषित केले जाईल आणि भविष्यात MSCE कोणत्याही भरती प्रक्रिये मध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर या बाबतीत चालू असलेल्या प्रक्रियेमधे निदर्शनास आले नाही परंतु नंतर कधी लक्षात आल्यास त्याला प्रक्रियेच्या प्रथम सत्रापासूनच अपात्र ठरविण्यात येईल.
वाचा   केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३|maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link

आपले प्रवेश पत्र तपासा

Important notice for maha tait examinees, don’t neglect

yellow and black caution wet floor sign
Photo by Tim Mossholder on Pexels.com


सोशल डिस्टन्सिंगच्या संदर्भात सूचना

 • उमेदवाराने कॉल लेटरमध्ये नमूद केलेल्या वेळेनुसार काटेकोरपणे परीक्षेच्या ठिकाणी अहवाल देणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्यांना परीक्षेची परवानगी दिली जाणार नाही.
 • ‘उमेदवार रोल नंबर आणि लॅब नंबर’ चे मॅपिंग परीक्षेच्या ठिकाणाच्या बाहेर प्रदर्शित केले जाणार नाही, परंतु उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश करताना वैयक्तिकरित्या ते सूचित केले जाईल.
 • उमेदवारांसाठी 3 वस्तूंना जागेवर परवानगी आहे
 • उमेदवारांना कार्यक्रमस्थळी केवळ काही वस्तू सोबत नेण्याची परवानगी असेल.
 • a) मुखवटा
 • b) वैयक्तिक हँड सॅनिटायझर (५० मिली)
 • c )एक साधा पेन आणि शाईचा स्टॅम्प पॅड (निळा/काळा)
 • d) परीक्षेशी संबंधित कागदपत्रे परीक्षेशी संबंधित कागदपत्रे (कॉल लेटर आणि आयडी कार्ड मूळ)
 • e )लेखक उमेदवारांच्या बाबतीत – लेखकाचा फॉर्म योग्यरित्या भरलेला आणि छायाचित्रासह स्वाक्षरी केलेला. कार्यक्रमाच्या आत इतर कोणत्याही वस्तूंना परवानगी नाही.
 • उमेदवाराने त्यांची कोणतीही वैयक्तिक वस्तू/साहित्य कोणाशीही शेअर करू नये.
 • उमेदवाराने एकमेकांशी सुरक्षित सामाजिक अंतर राखले पाहिजे.
 • उमेदवाराने कार्यक्रमस्थळी दिलेल्या सूचनांनुसार रांगेत उभे राहावे.
 • उमेदवार जर लेखकाची सेवा घेत असेल तर लेखकाने स्वतःचा मास्क आणावा.
 • परीक्षा संपल्यानंतर, उमेदवारांनी ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार गर्दी न करता व्यवस्थितपणे बाहेर पडावे.
वाचा   Scholarship Exam July 2022 Interim Answer List Released


तुम्हाला शुभेच्छा

1 thought on “maha tait परीक्षार्थींसाठी महत्वाची सूचना | Important notice for maha tait examinees, don’t neglect”

Leave a Reply

भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात 12 डिसेंबर 2023 पासून वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत
भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात 12 डिसेंबर 2023 पासून वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत