छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती|Speech for students at Rajarshi Shahu Maharaj jayanti 2023

Spread the love

Speech for students at Rajarshi Shahu Maharaj jayanti 2023

राजर्षी शाहू महाराज जयंती 2023 मधील विद्यार्थ्यांसाठी भाषण

स्वागत आहे, विद्यार्थी, प्राध्यापक आणि सन्मानित अतिथी! आज, आम्ही राजर्षी शाहू महाराज जयंती 2023 च्या शुभ मुहूर्तावर एका असाधारण नेत्याच्या जीवन आणि वारशाचे स्मरण करण्यासाठी येथे जमलो आहोत. राजर्षी शाहू महाराज, द्रष्टा राजा आणि समाजसुधारक, न्याय, समता आणि शिक्षणासाठी त्यांच्या अतूट बांधिलकीने पिढ्यांना प्रेरणा देत आहेत.

या विशेष दिवसाच्या स्मरणार्थ, आम्ही सहा विचारप्रवर्तक भाषणांची मालिका तयार केली आहे, प्रत्येक भाषणात राजर्षी शाहू महाराजांच्या उल्लेखनीय योगदानाच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या प्रतिष्ठित संस्थेच्या विद्यार्थ्यांना, त्यांची तत्त्वे पुढे नेण्यासाठी आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आम्हाला प्रबोधन आणि प्रवृत्त करण्याचा या भाषणांचा उद्देश आहे.

राजर्षी शाहू महाराज जयंती 2023 मधील विद्यार्थ्यांसाठी भाषण क्रमांक ०१

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निम्मिताने  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी यांचे  सहर्ष स्वागत .. 

सिंहाची चाल, गरुडा ची नजर,

 महिलांचा आदर, शत्रूचे मर्दन, 

असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, 

हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण.

छत्रपती राजर्षी शाहु महाराज

यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता कारण की त्यांनी पेरलेले शिक्षणाचे रोप आज  वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहे .

आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून चे झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवले ते शाहू छत्रपतींनी या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे  फुठले. शेकडो वर्षे ज्ञान ,सत्ता, संपत्ती या पासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आयुष्यभर ध्यास घेतला होता. 

लोकराजा कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक, 
बहुजनांचा आधार .. कुशल व्यवस्थापक ,
 जलनीती  तज्ञ ..
 छत्रपती राजश्री शाहू महाराज. 
यांना मानाचा मुजरा 

            छत्रपती  राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकऱ्यांचा उद्धारकर्ता, दूरदृष्टीचा विशाल मनाचा राजा व एक लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, – मागासलेल्या तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक कार्य केले. त्यात गुन्हेगारी जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्काबंद, मुलांच्या सक्तीच्या शिक्षणासाठी पालकांना दंड, सहकारीत्वाची भावना वाढविणे, जनहितार्थ कायद्याची मांडणी करणे, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे, विधवा पुर्नविवाह कायदा आणणे, मूलगामी सुधारणा करणे, शेतीसाठीची पाणीव्यवस्था पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे आणि मालासाठी बाजारपेठा व कारखाने यांची उभारणी हे उरिष्ट्ये पेवून शाहू महाराजांनी ‘नव्या सामजिक क्रांतीचा’ पुरस्कार केला.

शिक्षणाची संकल्पना, जानवार नेतृत्व स्वाबलंबन, शिस्त, सहकार्य, नियमितता, सहिष्णूता, देशप्रेम इत्यादी गुणासाठी प्रयत्न केले. लोकशाही, नवनिर्मितीक्षम आणि सामाजिक सुधारणेचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक धोरण आजही देशाला प्रेरणादायी ठरत आहे. वसतीगृहे, शिष्यवृत्ती, शाळा व नोकरीत राखीव जागाची तरतुद, जातीप्रथेला विरोध, वेठबिगारीला विरोध, स्त्री शोषणाला विरोध करून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणूण सामाजिक सुधारणा, बंधुभाव, शिक्षण, कृषी, उद्योग, कला या क्षेत्रात केलेले लोककल्याणकारी कार्य बहुजन समाजाला न्याय हक्क देण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे अश्या राष्ट्रपुरुषाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होवू शकत नाही. म्हणून या थोर माणसाच्या विचार व कार्याला समाजापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.

  एवढे बोलून मी माझे भाषण समाप्त करतो . 

                   जय हिंद जय महाराष्ट्र .


भाषण २ (विद्यार्थ्यां करिता )Speech for students at Rajarshi Shahu Maharaj jayanti 2023

प्रिय विद्यार्थी मित्रानो ,

सर्वांना नमस्कार .

माझे नाव …….. आहे. आज मी आपणासमोर राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती, बहुजनांचा आधार व थोर लोकराजा होते.  त्यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते. १७ मार्च १८८४ रोजी चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंताला दत्तक घेतले व त्यांचे नव्याने ‘शाहू’ असे नामकरण केले. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश दिला. त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा इ. क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केले. दुर्देवाने, राजर्षी शाहू महाराज यांनी ६ मे १९२२ रोजी अखेरचा श्वास घेतला.

अशा या महान जनतेचा राजा,
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्यवाद ! जय हिंद, जय महाराष्ट्र !


भाषण ३ (विद्यार्थ्यां करिता )

 माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निम्मिताने  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी यांचे  सहर्ष स्वागत .. 

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम ! आज या दिनाचे औचित्य साधून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट मी आपणा समोर सादर करणार आहे.

महाराज शिकारीत असताना एक पारधी मारलेल्या सश्याच्या कानाला धरून दूर उभा राहीलेला महाराजांना दिसला. महाराजांनी त्याला हुजऱ्याकडून पुढं बोलावून घेतलं, पारधी म्हणाला, ‘म्हाराजा, आपल्यासाठी मी ह्यो ससा मारून आणलाय. याचं कोरड्यास करुन जेव.’ हुजऱ्याकडं तो ससा देऊन आपल्या ताटात वाढण्यास महाराजांनी सांगितलं. दूपारी महाराजांच्यासह सगळे जण जेवायला बसले.

इतक्यात महाराजांना त्या पारध्याची आठवण झाली. तो कुठं दिसेना म्हणून त्याला शोधून आणायला माणसं पाठवली. पारध्याला शोधून त्याला महाराजांकडं आणण्यात आलं.

महाराज पारध्याकडे पहात हुजऱ्यांना म्हणाले, “याला पान करून जेवायला बसवा.”

इतक्यात एक सोवळेकरी म्हणाला, “महाराज याला कोठे बसवू? त्या झाडाखाली ?”

महाराज म्हणाले,” याचंच अन्न मी खात आहे आणि त्याला झाडाखाली बसवू का म्हणून काय विचारतोस? माझ्या शेजारी बसव.”

अशे होते आपले छत्रपती शाहू महाराज.

माझे शब्द येथे संपवतो ,

जय हिंद ,जय महारष्ट्र


भाषण ४ (विद्यार्थ्यां करिता )

माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निम्मिताने  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी यांचे  सहर्ष स्वागत .. 

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम ! आज या दिनाचे औचित्य साधून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट मी आपणा समोर सादर करणार आहे.

महायुद्धाच्या दरम्यान कुट-एल आमारा इथं हिंदी फौजा तुर्की वेढ्यात अडकल्या होत्या. सैन्याची संपुर्ण रसद संपली होती. आता घोडे मारून खाण्याची वेळ आली. पण हिंदी शिपायांनी घोडे खाण्यास नकार दिला. ते म्हणाले आम्ही घोडे खाल्ले तर पुन्हा हिंदूस्थानात गेल्यानंतर लोक वाळीत टाकतील. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी शाहू महाराजांना लेखी खलिता पाठवून संपुर्ण प्रकार कळवला.

शाहू महाराजांनी हिंदी फौजांना निरोप पाठवला, “तुम्ही खुशाल घोड्याचं मांस खा. तुमच्या जातीपातीच्या, लग्नकार्यांची जबाबदारी मी घेतो. प्रसंगी तुमच्या परिवारातल्या आणि माझ्या संबधितामधल्या कुटुंबीयांमध्ये सोयरिकीची हमी मी घेतो.”

हा खलिता लष्करी अधिकाऱ्यांनी हिंदी फौजांना वाचून दाखवला तेव्हा भुकेनं व्याकुळ झालेल्या फौजेनं एकच जयघोष केला. छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. शाहू महाराजांचा धर्माहून मोठा असणारा पगडा पाहून ब्रिटिश अधिकारी आश्यर्यचकित झाले.

अशे होते आपले छत्रपती शाहू महाराज.

माझे शब्द येथे संपवतो ,

जय हिंद ,जय महारष्ट्र


भाषण ५ (विद्यार्थ्यां करिता )

माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निम्मिताने  व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी यांचे  सहर्ष स्वागत .. 

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम ! आज या दिनाचे औचित्य साधून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट मी आपणा समोर सादर करणार आहे.

१९०५ च्या जुलै महिन्यात महाराज नव्या राजवाड्यातून आपल्या फोर्ड मोटारीतून बाहेर पडले. गाडी चालवायला लिंगायत समाजाचा तरुण पोऱ्या होता. काही अंतरावर मोटारगाडीनं रस्ता सोडला आणि शेतवडीच्या तुंबलेल्या चिखलाच्या डबऱ्यात पडली.  महाराज खाली पडले ते थेट चिखलात.

चिखलानं महाराज राड झाले. क्षणात संताप अनावर झाला आणि या संतापातच महाराजांनी ‘घातलस मला खड्ड्यात’ असं म्हणत त्या तरूण मुलाच्या पाठीवर चपलेनी तडाखा दिला. महाराज स्वत: ड्रायव्हिंग करत निघून गेले.

दूसऱ्या दिवशी महाराजांच्या गाडीवर नवीन ड्रायव्हर होता. आपल्याला आलेल्या क्षणिक रागातून त्या मुलाला मारल्याचं महाराजांना वाईट वाटतं होतं. तो दिसला नाही, तेव्हा महाराजांनी त्या पोऱ्याला बोलवून घेतलं, तर तो रडत समोर आला.

महाराज म्हणाले, “का रं का रडतूयस ?”

पोरगा म्हणाला, “महाराज तुम्ही मारलं त्याचं मला कायबी वाईट वाटत न्हाय. पण लिंगायत समाजात चपलेचा मार खाल्ला की तोंड बघत नाईत. जातीत घेत नाईत.

आता मी काय करावं?” 

महाराजांनी लागलीच म्हैसकर फौजदारांना बोलावून घेतलं आणि फौजदारांना म्हणाले, या पोराचे नातेवाईक आणि जातीचे पुढारी यांना आज सायंकाळी पापाच्या तिकटीसमोर जमा करा. सोबत शेणकाल्यानं भरलेली बादली आणि फाटके पायताण आणा.

संध्याकाळी लिंगायत जातीची ७०-७५ पुढारी मंडळी पापाच्या तिकटीला जमली. महाराज आले. महाराजांच्या सुचनेनुसार जमलेल्या पुढाऱ्यांना पायतानाचा एक एक तडाखा मारण्यात आला. जमलेले पुढारी म्हणाले, “महाराज आम्ही काय केलं? आम्हाला अशी शिक्षा का?”

तेव्हा महाराज म्हणाले, रागाच्या भरात आम्ही ड्रायव्हर पोरावर चप्पल उगारली. त्याची शिक्षा त्याला जातीतून बाहेर काढायची देता. आता सगळ्यांचीच जात बिघडली आहे…

अशे होते आपले छत्रपती शाहू महाराज.

माझे शब्द येथे संपवतो ,

जय हिंद ,जय महारष्ट्र


इतर शुभेछा संदेश संग्रह

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश

 why Hindi day celebrated on 14 September

50 good night sandesh marathi madhye

100 good morning sandesh for sharing in marathi

motivational quotes in marathi

 अभिनंदन शुभेच्छा संदेश

प्रेरणादायी विचार

रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges

25 happy birthday wish to boss/saheb in marathi

आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर

शाहू महाराज माहिती मराठी,शाहू महाराजां विषयी निबंध,छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य,छत्रपती शाहू महाराज भाषण,राजर्षी शाहू महाराज वंशावळ,शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध,shahu maharaj speech in marathi,shahu maharaj speech in english,shahu maharaj speech,shahu maharaj jayanti speech in marathi,shahu maharaj speech in marathi for students in marathi,

10 thoughts on “छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती|Speech for students at Rajarshi Shahu Maharaj jayanti 2023”

Leave a Reply

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह