The transfer of Zilla Parishad teachers has started from 10 feb 2025 on ottmahardd.com
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात
प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेस आजपासून सुरुवात
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेस आजपासून अधिकृत प्रारंभ झाला आहे. यासाठी बदली पोर्टलवर महत्त्वपूर्ण अपडेट्स करण्यात येत असून, शिक्षक व शाळांसंबंधित विविध कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करणे आवश्यक आहे.
बदली पोर्टलवर करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रक्रिया:
✅ शाळांची माहिती अपडेट करणे
✅ बंद शाळा क्लोज / डिलीट करणे
✅ शाळा ऍक्टिव्ह/इनऍक्टिव्ह करणे
✅ शिक्षक ऍक्टिव्ह/इनऍक्टिव्ह करणे
✅ शिक्षकांची माहिती तपासून व्हेरिफाय करणे
RDD (प्रादेशिक उपसंचालक) यांनी जारी केलेल्या वेळापत्रकानुसार ही सर्व कामे निश्चित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी RDD च्या वेळापत्रकाचा अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करावी.
नवीन शिक्षणसेवकांची माहिती नोंद अनिवार्य
बदली पोर्टलवर नवीन शिक्षणसेवकांची माहिती नोंदविणे आवश्यक असल्याने आजपासून CEO/EO लॉग इन सक्षम करण्यात आले आहे. लवकरच BEO लॉग इन देखील सुरू होणार आहे.
त्यामुळे गटस्तरावर नवनियुक्त शिक्षणसेवक तसेच पोर्टलवर अद्याप नोंद नसलेल्या शिक्षकांची माहिती तातडीने संकलित करून बदली पोर्टलवर अद्ययावत करावी.
महत्त्वाच्या तारखा:
📌 शिक्षकांनी माहिती संकलन व केंद्रप्रमुखांकडे सादर करणे
➡ 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2025 सायं. 5:00 पर्यंत
📌 केंद्रप्रमुखांनी BEO कार्यालयात माहिती सादर करणे
➡ 14 फेब्रुवारी 2025 सायं. 5:00 पर्यंत
📌 पोर्टलवर माहिती नोंदणी प्रक्रिया
➡ 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025
सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेचे भान ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.
ott mahardd Onlie Teacher Transfer Portal
ott mahardd Onlie Teacher Transfer Portal विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी Online Teacher Transfer सुधारित धोरण तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे.
time table for ott mahardd Onlie Teacher Transfer Portal

imp flow chart
ottmaharddcom वरून ट्रान्सफर ऑर्डर कशी डाउनलोड करावी
2 thoughts on “The transfer of Zilla Parishad teachers has started from 10 feb 2025 on ottmahardd.com”