ullas nav bharat saksharat karyakram 2024-sarvay form 1 to 6 pdf and excell download now
उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रम (सन २०२२-२७) अंमलबजावणी करिता सन २०२४-२५ -शाळा बाह्य विद्यार्थी सर्वेक्षण व असाक्षर व्यक्ती सर्वे –
डाउनलोड करा प्रपत्र १ ते ६ (pdf आणि excell नमुने )
केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शासन निर्णय दि.१४.१०.२०२२ अन्वये राज्यामध्ये सन २०२२-२३ ते २०२६ – २७ या कालावधीत उल्लास- “नव भारत साक्षरता कार्यक्रम” या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय दि. २५.१.२०२३ अन्वये सदर योजनेच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.३ अन्वये, मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षेतेखाली दि. १८.०४. २०२३ रोजी संपन्न झालेल्या राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण- नियामक परिषदेच्या बैठकीमध्ये केंद्र / राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेचे कामकाज पूर्ण करणेबाबत निर्देशित केलेले आहे.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्याकरीता ६ लक्ष २० हजार तसेच सन २०२३ २४ या वर्षाकरिता ६ लक्ष २० हजार एवढे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. दोन्ही वर्षातील एकूण १२ लक्ष ४० हजार एवढे उद्दिष्ट सन २०२४- २५ करिता कायम ठेवण्यात आलेले आहे. (मध्यान भोजन कैलकुलेटर 2024| mdm poshan aahar dainik praman calculator 2024)
त्या उद्दिष्टापैकी अद्यापपर्यंत ६,७०,३७५ इतकी असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्लास ॲपवर झालेली असून ५, ६९, ६२५ इतकी असाक्षर व्यक्तींची नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने असाक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी दाखलपात्र विद्यार्थी शोध मोहिम तसेच शाळाबाहय विद्यार्थी सर्वेक्षणासोबत असाक्षरांचे व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत.
संचालनालयस्तरावरुन नव भारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणीसाठी देण्यात आलेल्या वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये सर्वेक्षणाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी राज्यात दिनांक ०५/०७/२०२४ ते २० /०७/२०२४ पर्यंत शाळाबाहय विद्यार्थी सर्वेक्षण मोहिम राबविणेबाबत पत्र निर्गमित केलेले आहे. तरी या सर्वेक्षणासोबतच उल्लास कार्यक्रम अंमलबजावणीसाठी असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
·
नव भारत साक्षरता
त्याअनुषंगाने आपण आपल्या जिल्हयातील शाळांना सोबत देण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये असाक्षर व्यक्ती व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करुन असाक्षर व्यक्तींची उल्लास अॅपवर नोंदणी व स्वयंसेवकासोबत टॅगिंग करण्याबाबत सूचना देण्यात आलेले आहे .
असाक्षर व्यक्ती सर्वेक्षण प्रपत्र १ ते ६
सर्वेक्षण प्रपत्र | excell | |
प्रपत्र १ (असाक्षर यादी) | डाउनलोड | डाउनलोड |
प्रपत्र २ (स्वयंसेवक माहिती ) | डाउनलोड | डाउनलोड |
प्रपत्र ३ (शाळा स्तर सांख्यिकी माहिती ) | डाउनलोड | डाउनलोड |
प्रपत्र ४ (केंद्र स्तर सांख्यिकी माहिती ) | डाउनलोड | डाउनलोड |
प्रपत्र ५ (तालुका स्तर सांख्यिकी माहिती ) | डाउनलोड | डाउनलोड |
प्रपत्र ६ (जिल्हा स्तर सांख्यिकी माहिती ) | डाउनलोड | डाउनलोड |