या वर्षी २०२३ -२४ केव्हां पासून असेल उन्हाळी सुट्टी ? जाणून घ्या|When will summer vacation start this year 2023-24 in maraharahtra? find out

Spread the love

शिक्षण संचालनायनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात 2022- 23 मधील उन्हाळी सुट्टीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 2 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दिनांक 11 जून 2023 पर्यंत देण्यात आला आहे.

 पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023 -24 दिनांक 12 जून 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता , उन्हाळ्याची सुट्टी नंतर तेथील शाळा 26 जून 2023 रोजी सुरू होतील. इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचा निकाल 30 एप्रिल 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत शाळांना जाहीर करता येईल.

शाळातून उन्हाळ्याची व  दिवाळीची दीर्घ सुट्टी समायोजित करून त्या ऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यासारख्या सणाच्या प्रसंगी ती समायोजित करण्याचे संबंधित जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी आपल्या स्तरावर नियोजन करावयाचे आहे.

सदर परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे ; की आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी जर त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल तर त्याच्या पुढील दिवशी तसेच विदर्भातील सर्व शाळा जून महिन्याच्या चौथ्या सोमवारी सुरू होतील .

काय आहे परिपत्रकात जाणून घेवूया

. 1)मंगळवार, दि. 02 मे, 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करुन सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. 11 जून, 2023 पर्यंत

ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये दुसरा सोमवार, दि. 12 जून, 2023 रोजी शाळा सुरु करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. 26 जून, 2023 रोजी सुरु होतील.

2. इ. 1 ली ते इ. 9 वी व इ.11 वी चा निकाल दि. 30 एप्रिल, 2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तथापि, तो निकाल विद्यार्थी / पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.

3. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवेजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक निर्देश आपले स्तरावरुन द्यावेत.

4. माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षांतील सर्व प्रकारच्या एकुण सुट्टया 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

5. वरीलप्रमाणे शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचीत करावे.

summer holidays for schools in Maharashtra 2023 24,Maharashtra summer vacation 2023 24,2023 school summer holidays,school holidays 2023 maharashtra,2023 summer vacation date,primary school holiday list 2023,महाराष्ट्रातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या 2023 24,महाराष्ट्राच्या उन्हाळ्याच्या सुट्या 2023 24,2023 शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्या,शालेय सुट्या 2023 महाराष्ट्र,2023 उन्हाळ्याच्या सुट्टीच्या तारखा,प्राथमिक शाळांच्या सुट्टीची यादी 2023,

read this

50 good night sandesh marathi madhye

100 good morning sandesh for sharing in marathi

motivational quotes in marathi

 अभिनंदन शुभेच्छा संदेश

प्रेरणादायी विचार

रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges

25 happy birthday wish to boss/saheb in marathi

आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर

Leave a Reply

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह