Scholarship Exam July 2022 Interim Answer List Released

Spread the love

Scholarship Exam July 2022 Interim Answer List Released

शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 अंतरिम उत्तर यादी प्रसिद्ध झाली

शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ ची अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन नोंदविण्यासाठी पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये दि. १८/०८/२०२२ ते दि. २८/०८/२०२२ रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

वाचा   best android apps for 5th scholarship examination (URDU)

रविवार दि. ३१ जुलै, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन

ऑनलाईन स्वरूपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

वाचा   Fraudsters obtained credit cards using Dhoni and Sachin's PAN information: How to avoid falling victim to this scam

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निबेदन भरण्याकरीता दिनांक १८/०८/२०२२ ते २८/०८/२०२२ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दि. २८/०८/२०२२ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी / ___ आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम

वाचा   Maker & Checker First Login (Create New Password) PFMS

उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :

१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव. आडनाव. वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १८/०८/२०२२ ते २८/०८/२०२२ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अंतरिम उत्तर सूची

1 thought on “Scholarship Exam July 2022 Interim Answer List Released”

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात